सोलापूरातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कचरा व्यवस्थापनात ज्ञानप्रबोधिनी प्रथम,  मिलिंद जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:05 PM2018-02-06T15:05:45+5:302018-02-06T15:08:54+5:30

मनपातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापनात शालेय स्तरावर ज्ञानप्रबोधिनीने तर महाविद्यालयीन स्तरावर परिसर स्वच्छतेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.

Gyan Prabhodini first in Garbage Management of Clean Survey Competition in Solapur, Prize Distribution by Milind Joshi | सोलापूरातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कचरा व्यवस्थापनात ज्ञानप्रबोधिनी प्रथम,  मिलिंद जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

सोलापूरातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कचरा व्यवस्थापनात ज्ञानप्रबोधिनी प्रथम,  मिलिंद जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

googlenewsNext
ठळक मुद्देमनपातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अंतर्गत शहरातील विविध संस्थांसाठी स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यात आलीमहाविद्यालयीन स्तरावर परिसर स्वच्छतेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविलाविजेत्यांना स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर, अभिनेता मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : मनपातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापनात शालेय स्तरावर ज्ञानप्रबोधिनीने तर महाविद्यालयीन स्तरावर परिसर स्वच्छतेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर, अभिनेता मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. 
मनपातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २0१८ अंतर्गत शहरातील विविध संस्थांसाठी स्वच्छतेबाबत स्पर्धा घेण्यात आली. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांमार्फत गुणांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय, उत्तेजनार्थ अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली. सोमवारी दुपारी हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या एका शानदार कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, मनीषा हुच्चे, आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुढील संस्थांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शालेय स्पर्धा, स्वच्छ विद्यालय: केएलई इंग्लिश मीडियम स्कुल, नागेश करजगी आॅर्किड स्कूल, सेंट थॉमस घनकचरा व्यवस्थापन: ज्ञानप्रबोधिनी, भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय, सेवासदन, जनजागृती: मनपा मुलींची केंद्र शाळा, सदर बझार, छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा, श्रीदत्त मराठी विद्यालय, श्रीशैलनगर, प्लास्टिक वापर: सेंट थॉमस, केएलई, बत्तुल प्रशाला, परिसर स्वच्छता: सेवासदन,नूमवि मराठी शाळा, भारती विद्यापीठ, विद्यार्थी स्पर्धा: छ. शिवाजी माध्यमिक विद्यालय, श्रीदत्त मराठी विद्यालय, बत्तुल प्रशाला, घोषवाक्य: एस. व्ही. सी. एस. हायस्कूल, बत्तुल,  कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळा, पालक सहभाग: एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, छ. शिवाजी माध्यमिक, के.एल.ई. प्राथमिक शाळा, भवानीपेठ, स्वच्छता अ‍ॅप: उमाबाई श्राविका, भारती विद्यापीठ, अण्णप्पा काडादी प्रशाला.
स्वच्छता मिशन उपक्रमशील शाळा: सेवासदन प्राथमिक, नू.म.वि.मराठी प्राथमिक, सेंट थॉमस इंग्लिश, अण्णप्पा काडादी,भारती विद्यापीठ माध्यमिक शाळा, कै. वि.मो.मेहता माध्यमिक शाळा, महाविद्यालय: डी. बी.  एफ. दयानंद,एल.बी.पी.महिला महाविद्यालय, डब्लू. आय.टी. कॉलेज, सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, संगमेश्वर, ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय.
--------------------
हॉस्पिटलमध्ये सीएनएस...
- हॉस्पिटल व हॉटेलसाठीही ही स्पर्धा घेण्यात आली. हॉस्पिटल: सीएनएस, धनराज गिरजी, एसपी इन्स्टिट्यूट, दहा बेड्स: निरीक्षणा, वाळवेकर, जोग नेत्र, २५ बेड: रमा, सनराईज, रिषभ, २७ बेड्स: दीप, कृष्णामाई, बलदवा, दवाखाना: आयुर्वेद मनपा, आरसीएच मजरेवाडी, आकाश.  लॉजिंग: सूर्या, सिटी पार्क, प्रथम, लॉजिंग व रेस्टॉरंट: साईप्रसाद, मंत्रालय, रितेश, रेस्टॉरंट: किनारा, सिप्स अ‍ॅन्ड बाईट्स, जय पॅलेस.

Web Title: Gyan Prabhodini first in Garbage Management of Clean Survey Competition in Solapur, Prize Distribution by Milind Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.