'एक लाख रुपये मानधन द्या'; सोलापूर इथं डॉक्टरांचे आंदोलन सुरू

By रूपेश हेळवे | Published: February 23, 2024 12:05 PM2024-02-23T12:05:44+5:302024-02-23T12:06:00+5:30

गुरूवारी सकाळी ओपीडी नियमित सुरू झाली. पण शुक्रवारी मात्र निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा थांबवली आहे, पण अत्यावश्यक सेवा सुरूच असणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

'Give an honorarium of one lakh rupees'; Doctor's protest started in Solapur | 'एक लाख रुपये मानधन द्या'; सोलापूर इथं डॉक्टरांचे आंदोलन सुरू

'एक लाख रुपये मानधन द्या'; सोलापूर इथं डॉक्टरांचे आंदोलन सुरू

सोलापूर : दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार येथे निवासी डॉक्टरांना एक लाखापेक्षा जास्त मानधन आहे. त्याप्रमाणे राज्यातील निवासी डॉक्टरांना एक लाख रुपये मानधन द्या या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी बी ब्लॉक समोर सगळे निवासी डॉक्टर एकत्र जमत आपल्या मागण्या मांडल्या.

संघटनेकडून काही दिवसापूर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून पुढील दहा दिवसात सगळ्या मागण्यांवर सकारात्मक विचार होईल असे अश्वासन देण्यात आले होते. पण अद्यापपर्यंत त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरूवारी सकाळी ओपीडी नियमित सुरू झाली. पण शुक्रवारी मात्र निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा थांबवली आहे, पण अत्यावश्यक सेवा सुरूच असणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

Web Title: 'Give an honorarium of one lakh rupees'; Doctor's protest started in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर