चारित्र्याच्या संशयावरुन सोलापूर शहरातील मुल्लाबाबा टेकडीजवळ प्रेयसीचा खून, प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:11 PM2018-02-14T13:11:38+5:302018-02-14T13:13:17+5:30

चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने पे्रयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा मुल्लाबाबा टेकडीजवळ घडली.

FIR against Priyanka, son of daughter in Solapur city | चारित्र्याच्या संशयावरुन सोलापूर शहरातील मुल्लाबाबा टेकडीजवळ प्रेयसीचा खून, प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयावरुन सोलापूर शहरातील मुल्लाबाबा टेकडीजवळ प्रेयसीचा खून, प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देफैमिदा फिरोज अन्सारी (वय ३२) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिलीपोलिसांनी आरोपी प्रियकर फिरोज उर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय ३२, रा. मुल्लाबाबा टेकडी ) याला अटक केली.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने पे्रयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा मुल्लाबाबा टेकडीजवळ घडली. पोलिसांनी आरोपी प्रियकर फिरोज उर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय ३२, रा. मुल्लाबाबा टेकडी ) याला अटक केली.
फैमिदा फिरोज अन्सारी (वय ३२) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. बिल्कीस इक्बाल शेख (वय ४०, रा. मुल्लाबाबा टेकडी, सिध्देश्वर पेठ) असे मृताचे नाव आहे.
 बिल्कीस हिचे नाशिक येथील इक्बाल याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर तिच्या नवºयाला दारुचे व्यसन लागल्याने ती नवºयाला सोडून आठ ते दहा वर्षांपासून मुलाबाळासह तिच्या आईसोबत राहत असे.
तिचे गल्लीतील राहणारा महेबूब उर्फ फिरोज चाँदसाब जमादार याच्याशी प्रेमाचे सूत जुळले. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीने मयत बिल्कीस हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळ्यावर व पोटावर वार करुन तिला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक पवार, सपोनि रमेश चिताकिंदी , सहायक पोलीस निरीक्षक पांढरे करत आहेत.

Web Title: FIR against Priyanka, son of daughter in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.