सोलापुरात रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू

By appasaheb.patil | Published: June 5, 2019 12:12 PM2019-06-05T12:12:43+5:302019-06-05T12:16:58+5:30

शहरातील सहा प्रमुख ईदगाह मैदानावर नमाज अदा; मुस्लिम बांधवाच्या घरी ईद मिलनाची रेलचेल सुरू

The excitement of Ramadan Id in Solapur; Happy anniversary of the Hindu-Muslim community | सोलापुरात रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू

सोलापुरात रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू

Next
ठळक मुद्दे- सोलापूर शहर व परिसरात रमजान ईदचा उत्साह- नमाज पठनानंतर एकमेकांना दिल्या शुभेच्छा- शहर पोलीसांकडून शहरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त

सोलापूर : महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर बुधवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर  हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील प्रमुख सहा ठिकाणच्या सर्व मशिदी व ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. 

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही. काल मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ी अमजद अली काझी यांनी बुधवारी रमजाई ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते़ बुधवारी ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते़ अली आदिलशाही ईदगाह (जुनी मील), शाही आलमगीर ईदगाह (पानगल प्रशाला पटांगण), नवीन आलमगीर ईदगाह (होटगी रोड), अहले-हदीस ईदगाह (छत्रपती रंगभवन शेजारी) व आसार महाल ईदगाह (किल्ला वेस) या पाच प्रमुख ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी ९ ते ११ पर्यंत सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.

देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खºया अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर गोरगरीब, अनाथ, भिक्षूक, फकीर, साधूंना दानधर्म करण्यात आला. ऐपतदार कुटुंबीयांनी वार्षिक उत्पन्नातील ठराविक हिस्सा (जकात) गोरगरिबांना दिला. 
ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्या च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते. 



 

Web Title: The excitement of Ramadan Id in Solapur; Happy anniversary of the Hindu-Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.