एस-टी बस न थांबविल्याने सोलापूरच्या पोलिसाने चालकाला मारहाण करून एसटीच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:00 PM2017-09-15T19:00:43+5:302017-09-15T19:00:52+5:30

एसटी बस न थांबविल्याचा राग एका पोलीसाला न आवरल्याने त्याने चक्क एसटी चालकाच्या श्रीमुखात लगावली़ तो एवढ्यावरच न थांबता दगडाने एसटीची काच फोडून अडीच हजार रूपयांचे एसटीचे नुकसान केले़

Due to not stopping the S-Bus bus, the policeman beat the driver and beat him | एस-टी बस न थांबविल्याने सोलापूरच्या पोलिसाने चालकाला मारहाण करून एसटीच्या काचा फोडल्या

एस-टी बस न थांबविल्याने सोलापूरच्या पोलिसाने चालकाला मारहाण करून एसटीच्या काचा फोडल्या

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मंगळवेढा दि १५ : एसटी बस न थांबविल्याचा राग एका पोलीसाला न आवरल्याने त्याने चक्क एसटी चालकाच्या श्रीमुखात लगावली़ तो एवढ्यावरच न थांबता दगडाने एसटीची काच फोडून अडीच हजार रूपयांचे एसटीचे नुकसान केले़ हा प्रकार रड्डे ते भोसे मार्गावर १४ रोजी सकाळी ९़३० वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी चालकाने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय सांगोलकर (रा. रड्डे) याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 
सांगोला आगाराची एसटी बस (एम.एच़ १४ बी. टी़ ३५१४) ही रड्डे येथे आली होती. ती सांगोल्याकडे जात असताना १४ रोजी सकाळी ९़३०च्या सुमारास पोलीस शिपाई विजय सांगोलकर हे कुटुंबासमवेत सांगोल्याला जाण्यासाठी थांबले होते. बसचालकाने बस उभी न केल्याचा राग न आवरल्याने मोटारसायकलवर एसटीचा पाठलाग करून बस रस्त्यात थांबविली़ त्यानंतर एसटी चालक दत्तात्रय दगडू केदार (रा. वासुद अकोला, ता. सांगोला) यांच्या श्रीमुखात लगावली़ त्यानंतर दगडाने चालकाच्या दरवाजाजवळील काच फोडली़ यात  एसटी महामंडळाचे अडीच हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे चालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर एसटी चालकाने बसमधील प्रवासी दुसºया बसने सांगोल्याकडे पाठविले़ ती बस मंगळवेढा पोलीस स्टेशन आवारात आणून लावली आहे. 

Web Title: Due to not stopping the S-Bus bus, the policeman beat the driver and beat him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.