सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:39 PM2018-01-17T14:39:54+5:302018-01-17T14:42:15+5:30

देशमुखांच्या वाड्यामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाच्या पूजाविधी आणि रात्री उशिरा मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या कप्पडकळीने (नंदीध्वज वस्त्र विसर्जन) यात्रेतील धार्मिक विधींची सांगता झाली

Due to the celebration of Siddheshwar yatra in Solapur, worship of Yogandha in Deshmukh, religious rituals of pilgrims, crowd of devotees for Kappadkhi ritual | सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी

Next
ठळक मुद्देदेशमुख वाड्यातील पूजा विधीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, यात्रेतील मानकरी आणि पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थितमानकरी राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते योगदंडाची विधिवत पूजा‘श्री’ला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पाचही नंदीध्वजांची हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर कप्पडकळीचा कार्यक्रम झाला.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : देशमुखांच्या वाड्यामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाच्या पूजाविधी आणि आज रात्री उशिरा मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या कप्पडकळीने (नंदीध्वज वस्त्र विसर्जन) यात्रेतील धार्मिक विधींची सांगता झाली. देशमुख वाड्यातील पूजा विधीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, यात्रेतील मानकरी आणि पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून सिद्धेश्वर कंटीकर यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ‘श्री’चा योगदंड देशमुखांच्या वाड्यात आणला. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू यांचे वाड्यात आगमन झाले. मानकरी राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते योगदंडाची विधिवत पूजा झाली. 
होमहवन आणि हिरेहब्बूंची पाद्यपूजाही देशमुख यांच्या हस्ते झाली. यानंतर देशमुखांनी हिरेहब्बूंना रुमाल, शाल, श्रीफलाचा आहेर केला. पूजाविधीच्या वेळी देशमुख परिवारातील पालकमंत्री देशमुख यांच्यासह ज्येष्ठ सदस्य सोमशंकर देशमुख, लीलावती देशमुख, पुष्पांजली देशमुख, संगीता, शिल्पा, क्षमा देशमुख, डॉ. उर्वशी आणि डॉ. किरण देशमुख, अक्षता, सिद्धेश, आदिराज, स्नेहा देशमुख उपस्थित होते.
पूजाविधी झाल्यानंतर देशमुख वाड्यामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कप्पडकळीपूर्वी हिरेहब्बू वाड्यात हिरेहब्बू यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसºया नंदीध्वजांची पूजा झाली. त्यानंतर नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरात आणण्यात आले.                          तेथे ‘श्री’ला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पाचही नंदीध्वजांची हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर कप्पडकळीचा कार्यक्रम झाला.

Web Title: Due to the celebration of Siddheshwar yatra in Solapur, worship of Yogandha in Deshmukh, religious rituals of pilgrims, crowd of devotees for Kappadkhi ritual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.