परराज्यातील कामगारांची मेहनती वृत्ती; बारा तासही काम करण्याची असते तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:11 PM2019-06-04T13:11:40+5:302019-06-04T13:14:43+5:30

सोलापुरातील चिंचोली औद्योगिक वसाहत; कुरकुर न करता मिळेल ते काम करण्यास सज्ज

Diligent attitude of workers in the suburbs; There is work to do for 12 hours | परराज्यातील कामगारांची मेहनती वृत्ती; बारा तासही काम करण्याची असते तयारी

परराज्यातील कामगारांची मेहनती वृत्ती; बारा तासही काम करण्याची असते तयारी

Next
ठळक मुद्देउत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या ३५ ते ४० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करतातपश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहेसध्या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत असेल असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले

अरुण बारसकर 

सोलापूर :  हाताला पडेल ते काम करण्याची असलेली तयारी, १२ तास काम करण्यासाठी नसलेली कुरकुर व कामातील प्रामाणिकता यामुळे चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांच्या नियुक्तीचे प्रमाण वाढले आहे. सध्या ८ ते १० हजार परराज्यातील कामगार या एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. अखंडपणे महिनाभर हे बाहेरच्या राज्यातील कामगार कामावर येतात, असे चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या ३५ ते ४० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करतात. यामध्ये पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. सध्या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत असेल असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले. चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्या चालकांचा बाहेरच्या राज्यातील कामगाराबाबतचा अनुभव चांगला आहे. हाताला मिळेल ते काम आनंदाने करणे, स्थानिक कामगारांसोबत आठ तास काम केल्यानंतर वाढीव चार तास काम करण्यासाठी कसलीही कुरकुर नसणे, शिवाय कामातील प्रामाणिकपणाही बाहेरच्या राज्यातील कामगारांमध्ये दिसून येतो. म्हणूनच अनेक वर्षांपासून बाहेरच्या राज्यातील कामगार टिकून आहेत

अवघे १५ कामगार मिळाले: केशव रेड्डी
- सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी वस्तुस्थितीचे एक उदाहरण सांगितले. औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला ५० कामगारांची गरज होती. कंपनीला जवळपासच्या गावातून अवघे १५ कामगार मिळाले. कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी पुरेसे कामगार नसल्याने कंपनीला परप्रांतीय कामगार शोधावे लागल्याचे अध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले. 

उत्तरप्रदेश, बिहारच्या कामगारांची संख्या वरचेवर कमी होतेय. पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशचे लोक कामासाठी मिळतात. बºयाचशा मोठ्या कंपन्यात स्थानिक कामगारच काम करतात. मध्यम व लहान कंपन्यात बाहेरच्या राज्यातील कामगार आहेत.
- केशव रेड्डी
अध्यक्ष,सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन

एकदा कंपनीला कामगार जोडून दिले की डोकेदुखी राहत नाही.आठवड्याला खर्चासाठी उचल घेतात व महिन्याला पगार दिला जातो. किमान वेतन दिले जाते. सध्या पश्चिम बंगालचे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत तर त्यानंतर मध्यप्रदेशचे.
-किरण माने
ठेकेदार, मजूर पुरवठादार

दोन महिने सुट्टीवर..
- मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील तरुण मुले ही वर्षातून दोनवेळा व दोन महिने सुट्टी घेऊन गावी जातात. १० महिने ते आठवड्याची सुट्टी वगळता नियमित कामावर येतात. काही कामगार तर सुट्टी दिवशीही कामावर येतात. त्यामुळे कंपन्यांना उत्पादनासाठी अडचण येत नाही. बाहेरच्या राज्यातील काही कामगार आता सहकुटुंबही येत असल्याने अशांची  राहण्याची सोय कंपनीच्या आवारातच केली जाते. त्यामुळे वेळेवर व निश्चित कामावर येतात. 

Web Title: Diligent attitude of workers in the suburbs; There is work to do for 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.