मुलाला निर्वस्त्र आठ किलोमीटर चालवून नवस केला पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:23 PM2018-10-25T14:23:11+5:302018-10-25T14:26:15+5:30

मश्रुम गणपतीची केली पूजा : मुलाचे नावही ठेवले गणेश; तब्बल आठ किलोमीटर पायपीट

The child has completed his ninth eight nos | मुलाला निर्वस्त्र आठ किलोमीटर चालवून नवस केला पूर्ण

मुलाला निर्वस्त्र आठ किलोमीटर चालवून नवस केला पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाला निर्वस्त्र चालवित असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेमंदिरात पोहोचल्यावर तेथील पुजारी भडंगे यांनी गणेशच्या हस्ते आरती करून घेतलीराहत्या घरापासून गणपती मंदिरापर्यंत सुमारे आठ कि. मि.  चालवत आणले

यशवंत सादूल 

सोलापूर : आपल्याला मूल व्हावे असा नवस संगमेश्वर नगर येथील नागेश व शीतल रणधिरे या दांपत्याने हिप्परगानजीक असलेल्या मश्रुम गणपतीला  केला होता. नवस पूर्ण होऊन मूल तीन वर्षांचे झाल्याने नवस फेडण्यासाठी त्याला वस्त्र परिधान न करता संगमेश्वर नगर येथील राहत्या घरापासून गणपती मंदिरापर्यंत सुमारे आठ कि. मि.  चालवत आणले आणि गणरायाचे दर्शन घेतले. 

नागेश रणधिरे हे ट्रकचालक आहेत. त्यांचा विवाह  २०१३ मध्ये झाला. सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या हिप्परग्याजवळील मश्रुम गणपतीवर त्यांची अफाट श्रद्धा आहे. मूल झाल्यास त्याला वस्त्र परिधान न करता चालवित दर्शनाला घेऊन येईन, असा नवस बोलला होता. त्यांना २९ सप्टेंबर २०१५ ला मुलगा जन्मास आला. आज तो साडेतीन वर्षांचा असून त्याचे नावही श्रद्धेपोटी गणेश असे ठेवले.
त्याला चालता येत असल्याने लहानपणीच हा नवस पूर्ण केलेला बरा या हेतूने बुधवारी सकाळी या मुलाला निर्वस्त्र पायी चालवत आणले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत जातात. हा योग साधून आजचा दिवस निवडला.

संगमेश्वरनगर येथील राहत्या घरापासून मुलाला घेऊन हिप्परगा तलावानजीक असलेल्या मश्रुम गणपतीच्या वाटेवर निघाले. या सात ते आठ किलोमीटरच्या अंतरात लहानग्या गणेशने आईबाबांकडे एकदाही कडेवर घेण्याचा हट्ट केला नाही. मंदिरात पोहोचल्यावर तेथील पुजारी भडंगे यांनी गणेशच्या हस्ते आरती करून घेतली. 

येणा-जाणाºयांना कुतूहल
- त्याला निर्वस्त्र चालवित असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी उघडे नका नेऊ, अंगावर कपडे तर घाला, असा सल्लाही दिला. अनेकांनी उत्सुकतेपोटी असे चालविण्याचे कारण विचारून घेतले. मार्गातील नागरिकांकडून होणाºया प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत या दांपत्याने मुलासह मार्गक्रमण सुरूच ठेवले. येणा-जाण्याºयांनामात्र याचे कुतूहल वाटून राहिले.

- मूल व्हावे यासाठी आम्ही गणपतीला नवस बोलला होता. ईश्वरकृपेने २९ सप्टेंबर २०१५ ला मुलगा झाला; योगायोग असा की, पुढच्या वर्षी २०१६ ला याच तारखेला आम्हाला मुलगी झाली. त्यामुळे बोललेला नवस पूर्ण करणे आमचे कर्तव्य होते. यात कसलीही अंधश्रद्धा नसून ही आमची गणपतीवरील नितांत श्रद्धा आहे. 
- शीतल व नागेश रणधिरे, सोलापूर

Web Title: The child has completed his ninth eight nos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.