चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया.. उद्यापासून 'रोजा'ला सुरूवात  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 07:49 PM2019-05-06T19:49:29+5:302019-05-06T19:53:58+5:30

सोलापूरचे शहर काझी अमजद अली यांनी रमजानाच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाल्याचे सांगितले. सोमवारी सायंकाळी आकाशात चंद्र दिसला.

Chand appeared, Ramzan started. Daily starting from Tuesday | चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया.. उद्यापासून 'रोजा'ला सुरूवात  

चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया.. उद्यापासून 'रोजा'ला सुरूवात  

Next

सोलापूर - रमाजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव 30 दिवस रोजा पकडतात. यंदाच्या वर्षातील रोजा उपवासाला उद्या म्हणजेच मंगळवार पासून सुरुवात होत आहे. चाँद नजर आ गया, रमजान शुरू हो गया... असे म्हणत मंगळवारपासून रमजान रोजाला सुरुवात होत असल्याचे सोलापूरचे शहर काझी अमजद अली यांनी सांगितले आहे.  

सोलापूरचे शहर काझी अमजद अली यांनी रमजानाच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाल्याचे सांगितले. सोमवारी सायंकाळी आकाशात चंद्र दिसला. त्यामुळे मंगळवारपासून रमजान सुरू झाला असून पहिला रोजा सकाळी 4.50 वाजता सुरू होणार आहे. तर संध्याकाळी 06 वाजून 49 मिनिटांनी हो रोजा सुटणार असल्याचेही काझी लोकमतशी बोलताना सांगितले. 

रमजान महिन्यातील रोजादिवशी दिवसभर काहीही खात-पान केले जात नाही. रमजान म्हणजे मुस्लीम कॅलेंडरचा नववा महिना असतो. मुस्लीम समाजाचे लोक या महिन्याला अतिशय पवित्र मानतात. रोजा ठेवणे म्हणजे नमाज पठण करणे, कुराण पढण करणे, जकात देणे आणि दान-धर्म करण्यासारखेच आहे. त्यामुळे रमजानच्या रोजांमुळे पुण्य लागते. यंदाच्या वर्षी 29 दिवस रमजान रोजा धरेल जाणार असून रमजानला सुरुवात होताच मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच ऐकमेकांना रमजान महिन्याच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत.  या महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन होताच, रमजान ईद साजरी करण्यात येईल. दरम्यान, रमजानची सुरुवात झाल्याने बाजारात विक्री होणाऱ्या म्हशीच्या दुधाने 80 रुपये प्रतिलिटर इतका दर गाठला आहे. 

Web Title: Chand appeared, Ramzan started. Daily starting from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.