भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:17 PM2018-03-30T16:17:05+5:302018-03-30T16:17:05+5:30

आजही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले़.

The BJP's plans are our blue print, Bal Nandgaonkar's hinges | भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

Next
ठळक मुद्देसोलापूरमधील पक्षस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर सोलापूर दौºयावरभाजपाने सर्व योजना मनसेच्याच ब्लू प्रिंटमधून उचलल्याचा आरोप

सोलापूर : सत्तेवर असलेल्या बीजेपी सरकारने ज्या काही योजना हाती घेतल्या आहेत त्या साºया मनसेने निवडणूक काळात जाहीर केलेल्या ब्लू प्रिंटमधील आहेत़ आजही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले़

कोल्हापूर आणि सोलापूरमधील पक्षस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर हे सोलापूर दौºयावर आले होते़ सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाने सर्व योजना मनसेच्याच ब्लू प्रिंटमधून उचलल्याचा आरोप केला़ पक्षस्थितीबाबत बोलताना आजही पक्षात अनेक नाराज आहेत, काही पक्षाच्या दरवाजात आहेत, कोणी बाहेर थांबलंय, कोणी रुसलंय आणि ऐकत नाही, अशा अनेक गोष्टी घडत असल्याचे सांगत यापुढे पक्षकार्यालयाने जे रिझल्ट देतील त्यांनाच पदे दिली जातील म्हणाले़ 

तसेच यावेळी शरद पवार यांच्याशी झालेली भेट आणि त्यापूर्वीच्या गुजरात दौºयावर प्रश्न उपस्थित केला असता लोक पाहिजे तेव्हा सोयीस्कर अर्थ काढत असतात, असे म्हणाले़ रतन टाटा यांच्या आवाहनावरून ते गुजरातला गेले़ गुजरातमध्ये त्यांना चांगली प्रगती दिसून आली आणि मोदींचे त्यावेळी राज ठाकरे यांनी कौतुक  केल्याचे म्हणाले़

 १२ वर्षे राज ठाकरे स्वत:च्या हिमतीवर पक्ष चालवत असल्याचे सांगून प्रत्येक पक्षाला यश-अपयश ठरलेले आहेच असे ते म्हणाले़ मनसे जेथे आहे तेथे आक्रमक आंदोलने होतात़ परंतु शेतकºयांच्या प्रश्नांवर मुंबईत जेवढी आक्रमकता दाखवली तेवढी मुंबईबाहेर दाखवता आली नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली़ 
यावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहर अध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते़.

बाबा जाधवराव संपर्कप्रमुख नाहीत
च्बाबा जाधवराव हे मनसेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख नाहीत आणि जयवंत माने जिल्हाध्यक्ष नसल्याचा खुलासा यावेळी नांदगावकर यांनी केला़ शेतकरी पक्षासाठी काम करणाºया बाबा जाधवराव यांना केवळ महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती़ तसेच जयंवत माने यांना आपण सांगण्यावरूनच तिकीट दिले गेले होते़ परंतु भालके गटाला मदत केल्याने त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढल्याचे त्यांनी सांगितले़ 

Web Title: The BJP's plans are our blue print, Bal Nandgaonkar's hinges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.