५०० रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपीक अटकेत

By Appasaheb.patil | Published: February 26, 2019 01:20 PM2019-02-26T13:20:28+5:302019-02-26T13:29:46+5:30

सोलापूर : पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेत असलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपीकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ...

The acceptance of a 500 rupees bribe was given by the junior clerk of Solapur Municipal Corporation | ५०० रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपीक अटकेत

५०० रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपीक अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे- मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेत झाली कारवाई- ५०० रूपये घेणे पडले कनिष्ठ लिपीकास महागात- सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोलापूर : पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेत असलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपीकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

नागेश वेदपाठक (वय ५४) असे लाच स्वीकारणाºया कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराच्या आईच्या बदलीची फाईल पुढे पाठविण्यासाठी वेदपाठक यानी पाचशे रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाच स्वीकारताना मंगळवारी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, जाधवर, जानराव, पवार, स्वामी आदी पथकातील पोलीस अधिकाºयांनी केली़ याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Web Title: The acceptance of a 500 rupees bribe was given by the junior clerk of Solapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.