नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:32 PM2018-03-31T12:32:27+5:302018-03-31T12:32:27+5:30

महापालिकेच्या विशेष सभेला केवळ ३ नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम अभावी महापौरांनी सभा तहकूब केली़

With the absence of the corporators, the meeting of Solapur Municipal Corporation | नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

Next
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत केवळ ३ नगरसेवक उपस्थित सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर सभेत १८० कोटी खर्चाचा ड्रेनेज  ठेका देण्याचा विषय मंजुरीसाठी होता़


सोलापूर : महापालिकेच्या विशेष सभेला तीनच नगरसेवकांची उपस्थिती असल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी शनिवार ३१ मार्च रोजी होणारी महत्वाची सभा तहकुब केली़ 
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केवळ ३ नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम अभावी महापौरांनी सभा तहकूब केली़ सभेला बसपाच्या आनंद चंदनशिवे, काँग्रेसच्या श्रीदेवी फुलारे, एमआयएमच्या साजेदा शेख हे तीनच नगरसेवक उपस्थित होते़ आजच्या सभेत १८० कोटी खर्चाचा ड्रेनेज  ठेका देण्याचा विषय मंजुरीसाठी होता़ त्यामुळे या विषयावरून चर्चा होणार असे वातावरण असतानाच अनेक सदस्यांनी सभेत दांडी मारली त्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर आली़

Web Title: With the absence of the corporators, the meeting of Solapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.