सोलापूर बाजार समिती निवडणुकीत २१ हजार शेतकरी मतदानापासून वंचित राहणार, सामायिक खात्यावरील एकाची नोंद घेण्याच्या निर्णयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:38 PM2018-02-10T12:38:57+5:302018-02-10T12:39:53+5:30

एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतकºयांना बसला आहे

21,000 farmers will be deprived of the voting in the Solapur Bazar committee elections, the decision to record a share | सोलापूर बाजार समिती निवडणुकीत २१ हजार शेतकरी मतदानापासून वंचित राहणार, सामायिक खात्यावरील एकाची नोंद घेण्याच्या निर्णयाचा फटका

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत २१ हजार शेतकरी मतदानापासून वंचित राहणार, सामायिक खात्यावरील एकाची नोंद घेण्याच्या निर्णयाचा फटका

Next
ठळक मुद्देराज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाउच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी युद्ध पातळीवर सुरू मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असताना एकाच उताºयावर एकापेक्षा अधिक शेतकºयांची नावे असल्याचे निदर्शनास आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : एकाच शेतजमिनीच्या उताºयावर एकापेक्षा अधिक नावे असतील तर फक्त पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक शेतकºयांना बसला आहे. या शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. 
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असताना एकाच उताºयावर एकापेक्षा अधिक शेतकºयांची नावे असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जिल्हा निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले होते. सहकार, पणन विभागाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सामायिक खात्यावरील पहिल्या क्रमांकावर असलेल्या शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचे आदेश दिले. सोलापूर बाजार समितीचे गण निश्चित करताना निवडणूक कार्यालयाने १ लाख २ हजार ९५९ मतदार निश्चित केले होते. यासाठी उताºयावरील सर्व शेतकºयांच्या नावाची नोंद घेतली होती. परंतु, नवे आदेश आल्यानंतर फक्त पहिल्या शेतकºयाचे नाव मतदार यादीत आले आणि इतरांची वगळण्यात आली.
---------------------
दोन तालुक्यातून वंचित मतदार 
उत्तर तहसीलदारांनी पूर्वी ८ अ उताºयावरील नोंदीनुसार ५४ गावातील ३९ हजार ८७१ मतदारांची नावे सादर केली होती. परंतु, सामायिक खात्यातील पहिल्या खातेदाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय आल्यामुळे तहसीलदारांनी नव्याने यादी केली. यात ११ हजार ८७० मतदारांची नावे वगळण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६३ हजार ०८८ मतदारांची नावे सादर करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे ५३ हजार २१४ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातूनही १० ते १५ हजार नावे वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 
-------------------------
मुदतीत होणार नाहीत निवडणुका...
- उच्च न्यायालयात बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्च २०१८ पर्यंत तर सोलापूर बाजार समितीची निवडणूक १४ एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून बाजार समिती प्रशासनाला मतदार याद्या पाठविल्या जातील. यानंतर बाजार समिती प्रारूप मतदार यादी तयार करून निवडणूक कार्यालयाला पाठविणार आहे. या मतदार यादीवर हरकती घेतल्या जातील. 

Web Title: 21,000 farmers will be deprived of the voting in the Solapur Bazar committee elections, the decision to record a share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.