‘एचआयव्ही’चे सोलापूर जिल्ह्यात १८ हजार रूग्ण; ...शून्याकडे वाटचाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:25 AM2018-12-01T11:25:46+5:302018-12-01T11:27:39+5:30

रेषो ०़८६ टक्क्यांवर : धोकादायक आजारासह जगताहेत १८ हजारांवर रूग्ण

18,000 patients of HIV in Solapur district; ... continue to move to zero | ‘एचआयव्ही’चे सोलापूर जिल्ह्यात १८ हजार रूग्ण; ...शून्याकडे वाटचाल सुरू

‘एचआयव्ही’चे सोलापूर जिल्ह्यात १८ हजार रूग्ण; ...शून्याकडे वाटचाल सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जात आहेजिल्ह्यात ‘एचआयव्ही’ बाधितांची संख्या ही १८,६६४ इतकी राज्यात सोलापूरचा चौथा क्रमांक

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये मागील दहा वर्षांत एचआयव्ही बाधितांची संख्या ७ टक्क्यांवरून चक्क ०़८६ टक्क्यांवर आली आहे़ तरीही जिल्ह्यात ‘एचआयव्ही’ बाधितांची संख्या ही १८,६६४ इतकी आहे़ राज्यात सोलापूरचा चौथा क्रमांक लागत असून, आधुनिक उपचार प्रणालीचा लाभ लवकरात लवकर मिळत असल्याचा हा परिणाम आहे़ शून्य गाठण्याच्या दृष्टीने सोलापूरकडून पावले पडत आहेत़ 

१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जात आहे़ जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय (डाबको) सोलापुरात सुरू झाल्यापासून पहिल्या स्थितीतील औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाली़ त्यानंतर झालेल्या पाठपुराव्यामुळे काही वर्षांतच दुसºया स्थितीतील प्रभावी औषधे उपलब्ध झाली़ डाबकोच्या पाठपुराव्यानंतर आता तिसºया स्थितीतील रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होत आहेत. १ जानेवारीपासून तिसºया स्थितीतील रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होत आहेत़ जिल्ह्यात एचआयव्ही बाधित पुरुषांची संख्या ही ५२ टक्के तर स्त्रियांची संख्या ही ४८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठाणे, पुणे, नगर, कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे बाधितांमध्ये आघाडीवर आहेत.ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रयत्न सुरू आहेत़ तसेच शासनाने उपचारासाठी बाधितांना ५० किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवासही मोफत दिला आहे़ काही दिवसांपासून ही योजना अमलात आली असून, एसटी बसच्या पासेसचेही वाटप सुरू झाले आहे़ तसेच अंत्योदय योजनेत बाधितांना सामावून घेण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना आदेश दिले आहेत़ यामुळे मागील काही दिवसांत ५३० बाधितांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात डाबकोला यश आले. या योजनेंतर्गत प्रत्येकाला ३२ किलो धान्य उपलब्ध होत आहे़ 

Web Title: 18,000 patients of HIV in Solapur district; ... continue to move to zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.