सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना १५ मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:44 AM2017-11-15T11:44:22+5:302017-11-15T11:47:55+5:30

15 constituencies for farmers in the elections for the Solapur Bazar committee | सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना १५ मतदारसंघ

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकºयांना १५ मतदारसंघ

Next
ठळक मुद्दे ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टातशेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आलीबाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र


अरूण बारसकर
सोलापूर दि १५ : ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांचा मतदानाचा अधिकार संपुष्टात आणत बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीची नियमावली शासनाने जाहीर केली आहे.  त्या-त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण शेतकºयांच्या सोईसाठी १५ गण(मतदारसंघ) पाडण्याचे बाजार समिती निवडणूक नियमावलीमध्ये नमूद केले आहे.
राज्यातील बाजार समिती संचालक निवडीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा सहकार व पणन विभागाने केला आहे. त्यानुसार शेतकºयांना मतदानाचा अधिकार देताना नव्याने नियमावली तयार करण्यात आली असून ती शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यावर आलेल्या हरकतींचा विचार करुन ३० नोव्हेंबर २०१७ नंतर नियमावली अंतिम केली जाणार आहे. यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, हमाल तोलार मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघातून संचालक निवडले जात होते. आता नव्या कायद्यानुसार विकास सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघ रद्द करण्यात आले असून, ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीच्या संचालकांचा मतदानाचा अधिकारही संपुष्टात आणला आहे.  नव्या नियमानुसार आता बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील किमान १० आर शेतजमीन असलेला शेतकरी सभासद मतदानाला पात्र ठरु शकतो.
---------------------------
सर्वसाधारणसाठी पाच हजार अनामत 
- शेतकरी सभासद पात्र यादीतून मतदाराचे किमान १५ समान भाग करण्यात येणार असून त्याची ओळख ‘गण’  नावाने राहणार आहे.
- प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्याअगोदर जिल्हा निवडणूक अधिकाºयांना बाजार कार्यक्षेत्राचे गण घोषित करणे बंधनकारक असून या शेतकरी मतदारसंघासाठी लॉटरी पद्धतीने संचालकासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.
- जिल्हाधिकाºयांकडून आलेली शेतकºयांची यादी बाजार समितीचे सचिव त्याची प्रारुप मतदार यादी तयार करतील. त्यामध्ये पाच वर्षांत किमान तीन वेळा अधिसूचित केलेला शेतमाल संबंधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्यांचाच समावेश असेल.
- व्यापारी व अडत्यांच्या मतदार संघासाठी अधिनियमाच्या तरतुदीमध्ये काम करण्यासाठी म्हणून परवाना धारण केला असेल त्यांचीच नावे समावेश होतील.
- हमाल व व्यापारी मतदारसंघाबाबत कार्यक्षेत्रात काम करणाºयांचीच नावे यादीत समावेश केली जातील.
- निवडणूक लढविण्यासाठी राखीव जागेकरिता अनामत एक हजार, सर्वसाधारणसाठी पाच हजार तर एका अर्जाची किंमत २०० रुपये राहील असे म्हटले आहे.

Web Title: 15 constituencies for farmers in the elections for the Solapur Bazar committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.