सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:01 AM2018-02-10T11:01:31+5:302018-02-10T11:03:50+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

10 lakh sanctioned for inscriptions of Hattarsang Kudal in Solapur district, first inscription in Marathi, steps taken by the government for conservation | सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

googlenewsNext
ठळक मुद्देआजपर्यंत मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येतो.साक्षरतेचा महान संदेश देणारा मराठी भाषेतील पहिला शिलालेख दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे आहेमराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात सापडला, ही अभिमानास्पद : सुभाष देशमुख,


महेश कुलकर्णी 
सोलापूर दि १०: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसा शासन आदेश ६ फेब्रुवारी रोजी परिपत्रकाद्वारे काढण्यात आला आहे.
साक्षरतेचा महान संदेश देणारा मराठी भाषेतील पहिला शिलालेख दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे आहे. येथील संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.स. १०१८ (शके ९४०) मध्ये कोरला असल्याची नोंद आहे. सोलापुरातील इतिहास संशोधक आनंद कुंभार यांनी हा शिलालेख शोधून काढला आहे. हा शिलालेख मराठी भाषेच्या उत्पत्ती संशोधनात महत्त्वाचा ठरतो आहे. ९९७ वर्षांपूर्वी कोरण्यात आलेला हा शिलालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्याही १८२ वर्षे जुना असल्याचे पुरावे मिळाले आहेत. 
आजपर्यंत मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येतो. परंतु तो इ.स. १०३९ (शके ९०५) शतकातील असून कुडलचा शिलालेख इ.स. १०१८ मधील असल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. 
------------------------
असा आहे शिलालेख
- शिलालेखाची लांबी ९४ सेंमी तर रुंदी १६ सेंमी आहे. तुळईची शिळा घडीव असून खोदण्यापूर्वी ती घासून गुळगुळीत करून घेतल्याचे दिसते. शिलालेखावरील अक्षरांची उंची एक सेंमी आहे. यावर कोरलेला अंक नागमोडी वळणातील, त्या काळातील लिपीतील आहे. पण अशाच प्रकारचा अंक दिवेआगार येथील ताम्रपटात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
-------------------
काय लिहिले आहे
- हत्तरसंग कुडल येथील या शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे, माघ कधनुळिकाळ छेळा’ तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळ नि १०००’ अशी संस्कृतमधील आहे. तिसºया ओळीत ‘यवाछि तो विजेया हो ऐवा’ असे स्पष्ट मराठीत कोरले आहे.
-------------------
मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात सापडला, ही अभिमानास्पद बाब आहे. याची प्रसिद्धी देशभर झाली पाहिजे. या हेतूने शिलालेखाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार असून मराठी भाषेची सेवाही होणार आहे. ही एक सुरुवात आहे. यानंतरही सोलापूरच्या मार्केटिंगसाठी जे जे करता येईल ते आपण करू.
- सुभाष देशमुख, सहकार मंत्री.

Web Title: 10 lakh sanctioned for inscriptions of Hattarsang Kudal in Solapur district, first inscription in Marathi, steps taken by the government for conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.