Video : बाइक रेसिंगच्या मैदानात बाइकर्सची बॉक्सिंग, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:45 PM2019-03-27T14:45:04+5:302019-03-27T14:47:45+5:30

बाईक रेसिंगचे अनेक व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील. बाईक रेसिंगवेळी झालेल्या अनेक विचित्र अपघातांचे व्हिडीओ पाहिले असतील.

Watch viral video of Costa rica national motorbike championship break into fight amidst race | Video : बाइक रेसिंगच्या मैदानात बाइकर्सची बॉक्सिंग, व्हिडीओ व्हायरल!

Video : बाइक रेसिंगच्या मैदानात बाइकर्सची बॉक्सिंग, व्हिडीओ व्हायरल!

Next

बाईक रेसिंगचे अनेक व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील. बाईक रेसिंगवेळी झालेल्या अनेक विचित्र अपघातांचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियात असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही जे बघाल ते याआधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल. 

झालं असं की, रेसिंग सुरू असताना दोन बाइकर्स एकमेकांना भिडलेत. एकमेकांना मारताहेत. म्हणजे रेसिंगच्या मैदानात बॉक्सिंग असं काहीसं हे चित्र आहे. आधी एका बाइकरने दुसऱ्याला बाईकने ठोकलं आणि त्याची बाईक सोडून दिली. नंतर दोघे एकमेकांना मारू लागले. 


हा व्हिडीओ कोस्टा रिका नॅशनल मोटारबाईक चॅम्पियनशिप रेसचा आहे. या भांडणामुळे दोन्ही बाइकर्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. रायडर जॉर्ज मार्टिनेस आणि मेरीओन काल्वो अशी या दोघांची नावे असून दोघांवरही इंटरनॅशनल मोटारसायकलिंग फेडरेशनने दोन वर्षांची बंदी घातली आहे. 

Web Title: Watch viral video of Costa rica national motorbike championship break into fight amidst race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.