सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून घाबरले लोक, पण सत्य आहे वेगळंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:16 PM2023-08-05T12:16:53+5:302023-08-05T12:25:22+5:30

Social Viral : या महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 26.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत काळ्या रंगाचं काहीतरी दिसत आहे.

Viral Video : Woman shared shocking video call it demon on the beach panama people scared know truth | सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून घाबरले लोक, पण सत्य आहे वेगळंच!

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून घाबरले लोक, पण सत्य आहे वेगळंच!

googlenewsNext

Social Viral :  एका महिलेने समुद्र किनारी दिसलेल्या अजब गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ बघून सगळेच हैराण झाले. काही लोक तर यातील गोष्टीला राक्षसही म्हटलं. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळेच अवाक् झाले. म्हणजे हे डोळ्यांना चकमा देण्यासारखं आहे. 32 वर्षीय ब्रेंडा गोंजालेजची नजर पाण्यावर पडली तेव्हाच तिला काहीतरी अजब दिसलं.

या महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 26.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत काळ्या रंगाचं काहीतरी दिसत आहे. लोक म्हणाले हा समुद्रातील एखादा विचित्र जीव असेल. पण ब्रेंडा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना मूर्ख बनवत होती. या फोटोत दिसणारी बाब म्हणजे चार वर्षाचा एक डॉगी होता. ज्याचं नाव लॉलिता आहे. पनामामध्ये राहणारा ब्रेंडा म्हणाली की, लॉलिता फार इंटॅलिजंट डॉग आहे. त्याला खूप ट्रिक्स माहीत आहेत आणि चांगला वागतो.

ती म्हणाली की, हा व्हिडीओ तिने एक फनी व्हिडीओ म्हणून शेअर केला. पण हा व्हिडीओ बघून लोक घाबरले. ती म्हणाली की, मी माझ्या डॉगीला पाण्यात भिजलेलं पाहिलं, पण एक मित्र म्हणाला की, हा एखाद्या भयावह जीवासारखा वाटत आहे.

महिलेने हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. तिने पाण्यात भिजलेल्या डॉगीच्या शेपटीला वेगळा शेप दिला आहे. त्याच्या पाठीमागून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यानंतर डॉग आपला चेहरा फिरवत कॅमेराकडे बघतो. 

Web Title: Viral Video : Woman shared shocking video call it demon on the beach panama people scared know truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.