हे प्रभू, हे जगन्नाथ...फटाफट चपात्या बनवण्याचा भन्नाट जुगाड, बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:38 AM2024-03-22T10:38:53+5:302024-03-22T10:43:39+5:30

Viral Video : काही लोक चपात्या बनवण्यात फारच एक्सपर्ट असतात. असंच काहीसं या महिलेबाबत म्हणता येईल.

viral Video : This is how you can make roti quickly viral trending video | हे प्रभू, हे जगन्नाथ...फटाफट चपात्या बनवण्याचा भन्नाट जुगाड, बघून व्हाल अवाक्...

हे प्रभू, हे जगन्नाथ...फटाफट चपात्या बनवण्याचा भन्नाट जुगाड, बघून व्हाल अवाक्...

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अवाक् करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या चपात्या बनवण्याची एक वेगळी स्टाईल दाखवणारा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. कोरोना काळात बऱ्याच लोकांनी चपात्या बनवतानाचे व्हिडीओ पोस्ट केले होते. पण या महिलेचा व्हिडीओ खरंच थक्क करणारा आहे. कारण यात ती ज्या स्टाईल आणि स्पीडने चपात्या बनवते ते तुम्ही कधी पाहिलं नसेल. काही लोक चपात्या बनवण्यात फारच एक्सपर्ट असतात. असंच काहीसं या महिलेबाबत म्हणता येईल. जे लोक चपात्या बनवून घामाघूम होतात त्यांनी हा व्हिडीओ बघायला हवा.

लवकर चपात्या बनवण्याचा खास जुगाड

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एकाचवेळी लवकर आणि जास्त चपात्या कशा बनवल्या जाऊ शकतात. व्हिडिओत महिलेने चपात्या बनवण्याचा एक हाय लेव्हल जुगाड दाखवला आहे. व्हिडीओ सुरूवातीला महिला पीठ मळते आणि पूर्ण गोळाच गॅसच्या ओट्यावर लाटते त्यानंतर एका छोट्या गोलाकार डब्याने गोलगोल चपात्या कट करते. पुढे महिला चारही चपात्या एकाचवेळी ताव्यावर पाचवते.

हा व्हिडीओ इन्स्टावर rajput_jodi_नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'शाबास....ही आयडिया भारताबाहेर जायला नको'. हा व्हिडीओ आतापर्यंत 32 मिलियनपेक्षा जास्त लोकांना पाहिलाय. तर 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. तसेच लोकांनी यावर भरभरून कमेंट्सही केल्या आहेत.  एकाने लिहिलं की, ताई...चपाती तर कच्ची राहिली. तर दुसऱ्याने लिहिलं की, एवढ्यात तर 10-12 चपात्या आरामात बनतील. तिसऱ्याने लिहिलं की, जर नॉर्मल पद्धतीने चपात्या बनवल्या तर लवकर बनतील. 
 

Web Title: viral Video : This is how you can make roti quickly viral trending video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.