Video : समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मरत होते व्हेल मासे, लोकांनी अशी केली मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 01:20 PM2019-07-20T13:20:42+5:302019-07-20T13:24:00+5:30

आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. पण इथे तसं बघायला मिळालं नाही.

Video : Pilot Whales in Georgia Are Saved From Being Beached | Video : समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मरत होते व्हेल मासे, लोकांनी अशी केली मदत!

Video : समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मरत होते व्हेल मासे, लोकांनी अशी केली मदत!

Next

अमेरिकेतील जॉर्जियामधील एक फारच कौतुकास्पद अशा घटनेची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. येथील East beach St. Simons Island वर माणुसकीचं एक उत्तम उदाहरण बघायला मिळालं. येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासे मृत्युमुखी पडत होते. पण लोकांनी पुढाकार घेऊन त्यांची मदत केली.

आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. पण इथे तसं बघायला मिळालं नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच व्हेल माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी हातभार लावला. त्यांची मदत करू लागले.

Dixie McCoy ने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केलाय. त्यात लोक कशाप्रकारे व्हेल माशांची मदत करताहेत हे दिसतंय.

(Image Credit : ABC New)

अर्थातच अनेकांना प्रश्न पडला असेल की, असं झालं कसं? इतके व्हेस मासे अचानक समुद्र किनाऱ्यावर येऊन का मरण पावत आहेत? याबाबत Georgia Department of Natural Resources चे बायोलॉजिस्ट क्ले जॉर्ज यांनी सांगितले की, 'अनेकदा असं होतं की, मासे दुसऱ्या माशांचा पाठलाग करत किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर पाणी कमी असतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो'.

हे मासे व्हेल माशांची एक प्रजाती आहेत. त्यांना Pilot Whales असं म्हटलं जातं. या माशांचा मनुष्यांना कोणताही धोका नसतो.
Dixie McCay यांनी मीडियाला सांगितले की, तिथे २० व्हेल मासे किनाऱ्यावर तडपत होते. तर इतर मीडिया रिपोर्टनुसार, तिथे कमीत कमी ४० ते ५० व्हेल मासे होते. लोक मदत करत होते. माशांची ही प्रजाती फारच दुर्मिळ आहे.

Web Title: Video : Pilot Whales in Georgia Are Saved From Being Beached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.