सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:13 AM2023-07-13T06:13:07+5:302023-07-13T06:13:35+5:30

सीमाच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ती पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बेधडकपणे उत्तर देताना दिसते.

Threats of Pakistani bandits from Seema Haider, talk of her being an ISI agent | सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

googlenewsNext

पब्जी गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या सचिन मीणा याच्या प्रेमात पडल्यानंतर लग्नासाठी पहिल्या पतीला सोडून ४ मुलांसह पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशभरात चर्चेत आहे. जामीन मिळाल्यानंतर सीमा हैदरने हिंदू धर्म तर स्वीकारलाच शिवाय मांसाहारही सोडल्याचे समोर आले आहे. तथापि, सीमावरून भारतीय नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. अशातच पाकमधील दरोडेखोरांच्या धमकीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

सीमाच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ती पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बेधडकपणे उत्तर देताना दिसते. मात्र, शुद्ध हिंदीत धडाधड उत्तरे देत असल्याने काहीजण तिच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची एजंट असल्याची शंका उपस्थित करीत आहेत. ती  प्रशिक्षित एजंट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिच्या वयावरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय, तिचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात असल्याचे वृत्तही व्हायरल झाले आहे. 

दुसरीकडे, सीमाला परत न पाठवल्यास येथील हिंदू महिला- मुलींवर अत्याचार करू, मंदिरांवर हल्ले करू, अशी धमकी कच्छमधील डाकू राणो शारने दिली आहे. याशिवाय व्हिडीओत बरेच अपशब्दही वापरलेत. सौदीत काम करणाऱ्या तिच्या पहिल्या पतीनेही सीमाला पाकिस्तानात परत पाठवावे, अशी विनंती व्हिडीओद्वारे केली आहे, तर जीव गेला तरी मी पाकिस्तानात परत जाणार नाही, तिथे गेल्यास मला दगड फेकून मारून टाकतील. मला कृपया भारतात राहू द्यावे, अशी विनंती सीमा माध्यमांद्वारे करीत आहे.

Web Title: Threats of Pakistani bandits from Seema Haider, talk of her being an ISI agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.