सुपर डुपर Video! हत्तीलाही मोबाईलचं याड लागलंय; माहुताकडे कसा बघतोय पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:44 PM2022-11-01T13:44:38+5:302022-11-01T13:45:54+5:30

तामिळनाडूच्या कुंभकोणम कुंभेश्वर मंदिरातील हे दृष्य आहे.

Super Duper Video! Even the elephant watching the mobile phone; See how it looking...Trending | सुपर डुपर Video! हत्तीलाही मोबाईलचं याड लागलंय; माहुताकडे कसा बघतोय पहा...

सुपर डुपर Video! हत्तीलाही मोबाईलचं याड लागलंय; माहुताकडे कसा बघतोय पहा...

googlenewsNext

हत्तींचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. काही चांगले हसविणारे असतात तर काही वाईट रडविणारेही असतात. कधी चिखलात खेळतानाचे व्हिडीओ असतात तर कधी जंगलात चिडलेले देखील असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

एका पाळीव हत्तीला मोबाईलचे एवढे वेड लागलेय की तो माहूत मोबाईल घेऊन बसला की हा देखील वाकून वाकून पाहत असतो. आता मोबाईल केवढा, हत्तीच्या डोळ्याएवढा. तरी देखील त्यातील दृष्ये पाहण्यासाठी हा हत्ती एक पाय दुमडून वाकत आहे. 

तामिळनाडूच्या कुंभकोणम कुंभेश्वर मंदिरातील हे दृष्य आहे. इंस्टाग्रामवर kerala_elephants या युजरने तो अपलोड केला आहे. माहुत खाली बसलेला असताना त्याच्या पाठीमागे उभा असलेला हत्ती त्याचा मोबाईल पाहत आहे. एके क्षणी असे वाटतेय की हा हत्ती आता तोल गेला तर माहुतावरच पडेल की काय? एवढा तो सज्जाच्या काठावर उभा राहून डोकावत आहे. म्हणजे फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांमधील सर्वात मोठ्या प्राण्यालाही मोबाईलची इतकी आवड निर्माण झाली आहे. 

एकदा तुम्हीच व्हिडीओ पहा ना...

Web Title: Super Duper Video! Even the elephant watching the mobile phone; See how it looking...Trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.