सोशल मीडियावर #MicrowaveChallengeचा धुमाकूळ; चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नेटकऱ्यांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:08 PM2019-03-23T17:08:43+5:302019-03-23T17:09:57+5:30

सध्या सोशल मीडिया आणि मोबाइल अॅप्सच्या या युगामध्ये Tik Tok ने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. एखादा रस्ता असो किंवा घर, कॉलेज असो किंवा शाळा लोक प्रत्येक ठिकाणी टिक-टॉक व्हिडीओ तयार करण्यासाठी धडपडत असतात.

Microwave challenge the new viral where people are spinning on the floor tiktok | सोशल मीडियावर #MicrowaveChallengeचा धुमाकूळ; चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नेटकऱ्यांची धडपड

सोशल मीडियावर #MicrowaveChallengeचा धुमाकूळ; चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नेटकऱ्यांची धडपड

Next

सध्या सोशल मीडिया आणि मोबाइल अॅप्सच्या या युगामध्ये Tik Tok ने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. एखादा रस्ता असो किंवा घर, कॉलेज असो किंवा शाळा लोक प्रत्येक ठिकाणी टिक-टॉक व्हिडीओ तयार करण्यासाठी धडपडत असतात. तरूणांसोबतच थोरामोठ्यांमध्येही टिक-टॉकची वाढती क्रेझ आहे. पण या टिक-टॉकवर सध्या एक ट्रेन्ड व्हायरल होत आहे. तसे तर सोशल मीडियावर अनेक नवनवीन ट्रेन्ड व्हायरल होत असतात. ज्यामध्ये 'microwave challenge' नाव देण्यात आलं आहे. अनेक लोक हे टॅलेंट एक्सेप्ट करत असून आपले व्हिडीओ अपलोड करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हे चॅलेंज जास्त अवघड नाही किंवा घातकही नाही. यामध्ये जमिनीवर बसून हात न हलवता फक्त गोल फिरायचं आहे. जसं मायक्रोवेव्ह फिरतं. 

BTS आणि EXO ची फेमस स्टेप

मायक्रोवेव्ह चॅलेंज मागील काही दिवसांपासून टिक-टॉकवर ट्रेन्ड करत आहे. ज्यानंतर सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही लोक हे चॅलेंज ट्राय करत आहेत. दरम्यान, या चॅलेंजबाबत अनेक लोकांचं म्हणणं आहे की, या चॅलेंजमध्ये जे मूव्स आहेत ते एका कोरियन बँड BTS आणि EXO ने 2016मध्ये पॉप्युलर केले होते.

एक विशिष्ट गाणं निवडलं जातं

'मायक्रोवेव्ह चॅलेंज'मध्ये साधारणतः एकच गाण्यावर परफॉर्म करण्यात येत आहे. हे गाणं 'Slow Dancing in the Dark' आहे.

हे गाणं यासाठी निवडण्यात आलं आहे की, यामुळे म्युझिकमध्ये एक 'डिंग' असलेली साउंड नोट आहे, जे ऐकण्यासाठी मायक्रोवेव्ह अलार्म साउंडप्रमाणे वाटतं. 

एक्सपरिमेंटही करत आहेत लोक

तसं पाहायला गेलं तर #Microwavechallenge सोबत काही एक्सपरिमेंटही करता येतात. दरम्यान या चॅलेंजमध्ये जमिनीवर बसून पाय लांब करून गोल फिरायचं असतं. परंतु अनेकजण यामध्ये वेगवेगळ्या एक्सपरिमेंट करत आहेत. instagram आणि twitter वर तुम्हाला या चॅलेंजचे खूप व्हिडीओ पाहाता येतील. 

आणखी काही #MicrowaveChallenge चे व्हायरल व्हिडीओ :

ट्विटरवरही चॅलेंज व्हायरल :






 

Web Title: Microwave challenge the new viral where people are spinning on the floor tiktok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.