जेव्हापासून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आगामी 'जलेबी' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय, तेव्हापासून सोशल मीडियात या पोस्टरवरुन मेम्सचा पाऊस आलाय. अनेक मेम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

या सिनेमातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती रेल्वेच्या खिडकीतून बाहेर येऊन अभिनेता वरुण मित्राला किस करताना दिसत आहे. आता लोकांनी या पोस्टरचे इतके व्हर्जन तयार केले की, याची कल्पना स्वत: महेश भट्ट यांनीही केली नसेल. आणि या पोस्टर्सच्या व्हर्जनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 

जलेबीच्या पोस्टरच्या निमित्ताने आयडिया आणि वोडाफोनच्या मर्जरचीही खिल्ली उडवण्याची संधी लोकांनी सोडली नाहीये. 

नोटाबंदी आणि या सरकारचे भक्त यांच्यावरही यातून गंमतीदार शेरेबाजी करण्यात आली आहे. 

एका यूजरने तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला थेट एखा बिल्डींगवरच लटकवले आहे. आणि या कामात तिला मुन्नाभाई मदत करत आहे. 
हे तर फारच गाजत असलेलं पोस्टर आहे. यात दोघेही रेल्वेच्या खिडकीतून थेट WWE च्या रिंगमध्ये पोहोचले आहेत. 


Web Title: Jalebi movie poster memes viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.