'बस'ला मीठी मारत ढसाढसा रडला चालक; निवृत्तीच्या दिवशी दिला भावनिक निरोप, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:04 PM2024-03-06T14:04:18+5:302024-03-06T14:07:14+5:30

कामाप्रती निष्ठा असावी तर अशी, याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच येईल. 

a viral video of tamilnadu bus driver gets emotional on retirement day he kisses wheel hugs bus video goes viral on social media  | 'बस'ला मीठी मारत ढसाढसा रडला चालक; निवृत्तीच्या दिवशी दिला भावनिक निरोप, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'बस'ला मीठी मारत ढसाढसा रडला चालक; निवृत्तीच्या दिवशी दिला भावनिक निरोप, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Viral Video : ज्या क्षेत्रात आपण कार्यरत असतो, त्या क्षेत्रात स्वत: ला झोकून देऊन केलेले काम आणि कामाप्रती असलेली निष्ठा कळते. काही जण आयुष्यभर स्वत: चं काम प्रामाणिकपणे करत आपल्या कामातूनच समाधान शोधतात. 

नुकताच एका बस ड्रायव्हरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. तामिळनाडूमधील एका बस चालकाच्या या व्हायरल व्हिडीओने अनेकांच्या भावनांना साद घातली आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशी बसला मिठी मारत ढसाढसा रडणाऱ्या या ड्रायव्हरचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या या ड्रायव्हरने ज्याने आपल्या आयुष्यातील ३० वर्षे बस सेवेसाठी समर्पित केली, त्याने निवृत्तीच्या दिवशी बसला भावनिक निरोप दिला.

अहोरात्र प्रवाशांच्या सेवेत राहून त्याच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवलं मुलांना लहानाचं मोठं केलं. आता त्याच कामातून निवृत्त होणं म्हणजे हा क्षण काळजाचं पाणी करणारा आहे. ३० वर्ष प्रामाणिकपणे  काम करत अखेर निवृत्तीच्या क्षणी हा ड्रायव्हर बसच्या स्टेअरिंच्या पाया पडतो. मोठ्या मायेनं, प्रेमानं बसला डोळे भरून पाहतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडलाय. 'हीच भारतीय संस्कृती' तसेच 'ही रील पाहिल्यानंतर मी खूप भावूक झालो आहे' अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे.

Web Title: a viral video of tamilnadu bus driver gets emotional on retirement day he kisses wheel hugs bus video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.