तैवानमधील रणरागणी! मृत्यूनेही त्यांच्यासमोर टेकले गुडघे, भूकंपाचा VIDEO समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:38 PM2024-04-05T13:38:51+5:302024-04-05T13:41:04+5:30

तैवानमधील भूकंपाची स्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले.

a video of taiwan city earthquake nurses risk their lives to protect babies video goes viral on social media | तैवानमधील रणरागणी! मृत्यूनेही त्यांच्यासमोर टेकले गुडघे, भूकंपाचा VIDEO समोर

तैवानमधील रणरागणी! मृत्यूनेही त्यांच्यासमोर टेकले गुडघे, भूकंपाचा VIDEO समोर

Social Viral : तैवानची राजधानी तैपोईमध्ये गेल्या बुधवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. साधारणत: ७.२ रिश्टर स्केल इतकी तीव्रता असलेल्या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसेच वित्तहानी झाली. गेल्या २५ वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं तज्ञांच मत आहे. याचे धक्के शेजारील फिलिपाईन्स राज्यालाही जाणवले. त्यामुळे जपानमध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आलाय. 

तैवानमधील भूकंपाची स्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले. जीव मुठीत घेऊन मरण डोळ्यांनी पाहणाऱ्या त्या जपानी लोकांच्या सुटकेचे व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर आले. सध्या जपानमधील एका रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या समोर आलाय. 

मानवी सेवा करणाऱ्याच्या भावनेतून रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी काम करत असतो. वैद्यकीय क्षेत्र हे परिचारिकांशिवाय अपूर्णच आहे. याचाच प्रत्यय तैवानमधील हा व्हिडिओ पाहून येईल. समोर मृत्यू दार ठोठावत असताना आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या जपानमधील परिचारिकांचा ३१ सेकंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. भूंकपावेळी तैवानमधील स्थिती, एकंदरीत हॉस्पिटल प्रशासनाची उडालेली तारांबळ या व्हिडिओतून दिसतेय. 

दरम्यान, ज्या क्षणी भूकंप होतो त्यावेळी हॉस्पिटलमधील नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये परिचारिका धावत येतात, ज्यामध्ये त्या बालकांना ठेवलं होतं. भूकंपाच्या धक्क्यामुळे संपूर्ण हॉस्पिटल हालत असताना स्वत: च्या जीवाची पर्वा न करता अशा परिस्थितीत बालकांना इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्ट्रॉलर धरले. या तीन परिचारिकांनी बालकांचे  प्राण वाचवण्यासाठी  केलेली धडपड या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

 X वर @IamNishantSh नावाच्या हँडलवरून हा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. “भूकंपाच्या क्षणी मुलांचे रक्षण करणाऱ्या तैवानच्या परिचारिका. आज मी इंटरनेटवर पाहिलेल्या सर्वात सुंदर व्हिडिओंपैकी हा एक व्हिडिओ आहे. या शूर परिचारिकांना सलाम.” या व्हिडिओला असं कॅप्शन देत या यूजरने परिचारिकांच्या कार्याला सलाम केला आहे. 

Web Title: a video of taiwan city earthquake nurses risk their lives to protect babies video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.