जगातील सर्वात लहान घर, बेडरूमसह सोयी-सुविधांनी परिपूर्ण, पण महिन्याचं भाडं ऐकून चकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 04:31 PM2024-04-08T16:31:21+5:302024-04-08T16:35:00+5:30

सोशल मीडियाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.

a video of a small home in london goes viral on social media but rent rs 2 lakh users compared it to matchbox | जगातील सर्वात लहान घर, बेडरूमसह सोयी-सुविधांनी परिपूर्ण, पण महिन्याचं भाडं ऐकून चकित व्हाल

जगातील सर्वात लहान घर, बेडरूमसह सोयी-सुविधांनी परिपूर्ण, पण महिन्याचं भाडं ऐकून चकित व्हाल

Social viral :सोशल मीडियाचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. जगाच्या पाठीवर कुठं काय घडतंय याची पुरेपूर माहिती देणारं हे एक आभासी जग आहे. करमणुक,  शिक्षण तसेच माहितीची आदान-प्रदान इथे अगदी सहजरित्या करता येते. रिल्सच्या या युगात सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. याचा प्रत्यय इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच येईल...

सध्या एक्सवर एका घराचा व्हायरल होणारा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या घराची खासियत म्हणजे एका माचिसच्या डब्ब्याचा जेवढा आकार असतो, त्या आकारा एवढंच घर या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यामुळे हा व्हिडिओ कुतुहलाचा विषय ठरलाय.

आपलं एक हक्काचं असं स्वत:च  घर असावं हे अनेकांच स्वप्न असतं. पण वाढत्या महागामुळे अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे अर्धवट राहतं. मुंबईसारख्या शहरात भाड्याच्या घरात राहून उदरनिर्वाह करणं हे मोठं जिकरीचं काम म्हणावं लागेल. त्यामुळे सोयी-सुविधांची उणीव असली तरी  कोणत्याही परिस्थितीत राहण्यास लोकांची पसंती असते. अशातच हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. 

माचिसच्या छोट्या डब्ब्याप्रमाणे आकार असणाऱ्या या घराचा व्हिडिओ लंडन मधील असल्याचा सांगण्यात येतोय. या घराचं महिन्याचं भाडं तब्बल २ लाख रुपये इतकं आहे. या घराची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या घरात एक छोटा बेड आहे. त्याचबरोबर टीव्ही, कपाट या चैनीच्या वस्तू शिवाय रुम तसेच अटॅच्ड बाथरुम देखील आहे. आतापर्यंत हा व्हायरल व्हिडिओ ४.७ मिलीयन पेक्षा अधिक  लोकांनी पाहिला आहे. तसेच काही यूजर्सनी यावर तुफान कमेंट देखील केल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओवर ''माझं स्वयंपाक घर पाहा'' अशी कमेंट एका नेटकऱ्यानी केली आहे. तर दुसरा यूजर म्हणतो- ''या घरात फक्त एकच माणूस राहु शकेल'' अशा गंमतीदार प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर  दिल्याच्या पाहायला मिळतायत. 

Web Title: a video of a small home in london goes viral on social media but rent rs 2 lakh users compared it to matchbox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.