नेहरु युवा केंद्राच्या निबंध स्पर्धेत विनायक पाटील यांना प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:57 PM2017-09-16T17:57:03+5:302017-09-16T17:57:03+5:30

 नेहरु युवा केंद्रामार्फत स्वच्छतेसाठी काय करु शकेन या विषयावर आधारीत निबंध स्पर्धेमध्ये विनायक विश्वास पाटील, आत्माराम अनंत पवार, शिवराम यशवंत तवटे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.

Vinayak Patil's first place in essay competition of Nehru Yuva Kendra | नेहरु युवा केंद्राच्या निबंध स्पर्धेत विनायक पाटील यांना प्रथम क्रमांक

नेहरु युवा केंद्राच्या निबंध स्पर्धेत विनायक पाटील यांना प्रथम क्रमांक

Next

सिंधुदुर्गनगरीदि. 16‌ नेहरु युवा केंद्रामार्फत स्वच्छतेसाठी काय करु शकेन या विषयावर आधारीत निबंध स्पर्धेमध्ये विनायक विश्वास पाटील, आत्माराम अनंत पवार, शिवराम यशवंत तवटे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.

प्रथम विजेत्या स्पर्धकाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपयाचे बक्षिस राहणार आहे. आजच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पाचशे, तीनशे व दोनशे रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले.

            नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दी या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व लघुचित्रफित स्पर्धा याचे आयोजन पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाफळे यांनी केले.

यावेळी प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक समृध्दी मळेकर यांनी केले याप्रसंगी परीक्षक स्मिता सरवनकर, स्मिता केळूसकर, योगिता वायगंणकर तसेच नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक सहदेव पाटकर व गोपाल लोके उपस्थित होते. निबंध स्पर्धेचे नियम व अटी आणि त्यामागील आयोजनाची भूमिका स्मिता केळुसकर यांनी सांगितली.

Web Title: Vinayak Patil's first place in essay competition of Nehru Yuva Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.