वायंगणी गावाची गावपळण झाली सुरू, तीन दिवस गावाचा मुक्काम वेशीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:10 AM2019-03-12T11:10:30+5:302019-03-12T11:14:54+5:30

वायंगणी या गावाचे ग्रामदैवतही रयतेसह गावाच्या वैशीबाहेर जात गावपळणीला देवपळण म्हणून संबोधली जाणारी देवपळण सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे ३००० लोकवस्तीचा वायंगणी गाव हा आपल्या ग्रामदेवतेसहीततीन दिवस, तीन रात्रीसाठी गावाच्या वेशीबाहेर वास्तव्य गेला आहे.

The village of Vyangani village has started, three days away from the gate | वायंगणी गावाची गावपळण झाली सुरू, तीन दिवस गावाचा मुक्काम वेशीबाहेर

आपले लागणारे सामान घेऊन वायंगणी गावाच्या वेशीबाहेर जाताना ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देवायंगणी गावाची गावपळण झाली सुरूनिसर्गाच्या सान्निध्यात तीन दिवस गावाचा मुक्काम वेशीबाहेर

आचरा : वायंगणी या गावाचे ग्रामदैवतही रयतेसह गावाच्या वैशीबाहेर जात गावपळणीला देवपळण म्हणून संबोधली जाणारी देवपळण सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे ३००० लोकवस्तीचा वायंगणी गाव हा आपल्या ग्रामदेवतेसहीततीन दिवस, तीन रात्रीसाठी गावाच्या वेशीबाहेर वास्तव्य गेला आहे. शेकडो वर्षांची असणारी ही परंपरा आजही आधुनिकतेच्या प्रवाहात ग्रामस्थ स्वखुशीने जगत आहेत.

गावाबाहेर पडलेले ग्रामस्थ आचरा, कालावल, चिंदर गावाच्या माळरानावर राहुट्या करून गुराढोरांसह मुक्काम ठोकला आहे. तीन दिवस तीन रात्री गावातील ग्रामस्थ एकोप्याने राहत निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:ला सामावून घेतात.

व्हॉटस्अ‍ॅपच्या जमाना असतानाही वायंगणी गावपळणीत युवकवर्ग प्रौढांसमवेत मिळालेल्या निवांत वेळेत भजन, गाणी गात गजर घालताना दिसत आहेत. गावाचे ग्रामदैवत रवळनाथावर नितांत श्रद्धा वायंगणी ग्रामवासियांची आहे. त्यामुळे श्रद्धेने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू झाली.


वायंगणी गावातील घरे, मंदिरे अशा प्रकारे दरवाजांना झापे लावून बंद केली होती.

इतर गावामध्ये होणारी गावपळणीत फक्त गावातील ग्रामस्थ गावाबाहेर जातात. परंतु वायंगणी गावातील ग्रामदैवत रवळनाथ यांचे प्रतिक म्हणून एक श्रीफळ हे गावपळणीच्या दिवशी पहाटे साडेतीनच्या सुमारास चिंदर सडेवाडी येथे वास्तव्यास आणले जाते. यावेळी देवासह ग्रामस्थ तेथेच वास्तव्य करतात. तीन दिवस तीन रात्री तेथेच देवाची पूजा अर्चा होते. देवपळण व गावपळण असा संयुक्त मिलाफ यावेळी अनुभवता येतो.

श्री देव रवळनाथ यांच्या कौलाने वेशीबाहेर गेलेला गाव तीन दिवस तीन रात्री नंत देवाच्या हुकूमाने भरला जातो. या तीन दिवसांची मर्यादा गुरूवारी १४ रोजी पूर्ण होत असून यावेळी गावचे मानकरी एकत्र जमून सकाळी १० च्या सुमारास गाव भरण्याचा कौल घेणार आहेत. देवाने कौल दिल्यास गावाबाहेर गेलेले ग्रामस्थ पुन्हा गावात परतणार आहेत.

Web Title: The village of Vyangani village has started, three days away from the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.