भुईबावडा घाटात दगड रस्त्यावर, एकेरी वाहतूक : वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:39 PM2018-07-07T16:39:10+5:302018-07-07T16:40:07+5:30

वैभववाडी तालुक्यात तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी भुईबावडा घाटात दरडीचे दगड कोसळले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. दरम्यान तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या परिसरातील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

Vaibhavwadi taluka rises in rainy season | भुईबावडा घाटात दगड रस्त्यावर, एकेरी वाहतूक : वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर ओसरला

भुईबावडा घाटात दगड रस्त्यावर, एकेरी वाहतूक : वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर ओसरला

Next
ठळक मुद्देभुईबावडा घाटात दगड रस्त्यावर, एकेरी वाहतूक वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर ओसरला

वैभववाडी : तालुक्यात तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी भुईबावडा घाटात दरडीचे दगड कोसळले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. दरम्यान तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या परिसरातील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

तीन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारीही काही प्रमाणात दगडांची पडझड झाली होती. परंतु, वाहतुकीस अडथळा होत नव्हता.

शुक्रवारी दुपारी गगनबावड्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात दरडीचे दगड कोसळले. त्यातील काही दगड रस्त्यावर आले होते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती.

भुईबावडा घाटात वाहतूक कमी असल्यामुळे रस्त्यावर आलेल्या दगडांचा वाहतुकीवर तितकासा परिणाम झालेला नाही. तालुक्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून जनजीवन सुरळीत झाले आहे.

Web Title: Vaibhavwadi taluka rises in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.