विहिरीत पडले दोन गवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:13 PM2017-10-04T23:13:47+5:302017-10-04T23:13:47+5:30

Two wells fell in the well | विहिरीत पडले दोन गवे

विहिरीत पडले दोन गवे

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : शहरातील गोविंद नाट्यमंदिरच्या मागे असलेल्या विहिरीत मंगळवारी रात्री दोन गवे पडले. रात्रभर पाण्यात राहिल्याने यातील एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसºया गव्याला जीवदान देण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान, दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवलेल्या गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. उशिराने घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचाºयांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत सुमारे चार तासांनंतर गव्याची सुटका केली.
गोविंद नाटत्या कठड्यावरूनच गवे विहिरात पडले असावेत. घटनास्थळापासून काही अंतरावर राहात असलेल्या लक्ष्मी जाधव या आपल्या गाईच्या वासराला चरविण्यासाठी बुधारी सकाळी त्याठिकाणी गेल्या असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही गोष्ट घरातील माणसांना सांगितल्यानंतर स्वप्नील कामते, विजय सावंत, भार्गव धारणकर, मुजीब बेग आदी युवकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच विहिरीतील एका गव्याचा मृत्यू झाला होता, तर दुसरा मृत्यूशी झुुंज देत होता. युवकांनी दोरखंडाच्या सहाय्याने गव्याच्या शिंगांमध्ये फास अडकवला व विहिरीचा कठडा पाण्याच्या पातळीबरोबर तोडला. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने या प्रयत्नांना यश आले आणि गवा सुखरूप पाण्याबाहेर आला. हा गवा नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने युवकांनी त्याच दोरखंडाच्या साहाय्याने त्याला नजीकच्या माडाला बांधून ठेवले. तरीही गवा सैरभैर उधळू लागला. मात्र, शिंगात दोरखंडाचा फास अडकला असल्याने त्याला पळता आले नाही. त्यामुळे भेदरलेल्या स्थितीत तेथेच अडकून पडला.
दरम्यान, शहरात गवा पकडल्याची माहिती वाºयासारखी पसरली आणि काही मिनिटातच नागरिंकांनी घटनास्थळी गर्दी केली. तासाभरानंतर वनक्षेत्रपाल विजय कदम, वनपाल अमित कटक, प्रताप कोळे, बा. सी. ओटवणेकर, आमीर काकतीकर, संतोष मोरे, विशाल पाटील, चंद्रसेन धुरी आदी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पाहून भेदरलेला गवा दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करीत होता. दोरखंड तुटल्यास गवा नागरिकांच्या दिशेने धाव घेऊ शकतो, हे लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाºयांनी नागरिकांना दूर जाण्याची विनंती केली. दुपारी दोन वाजले तरी बघ्यांंची गर्दी कमी होत नव्हती. अखेर वनविभागाने कडक भूमिका घेत नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले. त्यानंतर दुसरा दोरखंड आणून विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या मदतीने शिताफीने गव्याच्या पायात दोरी अडकवत शिंगांमध्ये अडकलेला दोरखंडाचा फास काढला. त्यानंतर चार तासानंतर सुटका झालेल्या गव्याने नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने धाव घेतली.
दरम्यान, मृत झालेल्या गव्याला वनविभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले. रितसर पंचनामा केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या सर्व प्रकारात पोलीस प्रशासन मात्र दूर राहिल्याने वनविभागाच्या अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी दूर करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाºयांना नाकीनऊ आले. यावेळी त्यांनी सावंतवाडी पोलिसांची मदत मागितली. मात्र, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी आणि अन्य एक कर्मचारी वगळता कोणीच फिरकले नाहीत. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी नाराज होते.
्यमंदिरच्या मागे असलेल्या विहिरीचा कठडा जमिनीपासून केवळ एक फूट उंच आहे.

Web Title: Two wells fell in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.