बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:55 AM2018-09-12T01:55:20+5:302018-09-12T01:55:34+5:30

केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल.

Trial landing before the permission of Balhattahata - Nitesh Rane | बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

Next

सावंतवाडी : केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल. पण चिपी विमानतळाला फक्त २५ परवानग्या असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे आपल्या स्वत:च्या हट्टापायी बुधवारी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जर सरकारी कार्यक्रम असेल तर केसरकर यांनी त्या विमानात बसून यावे, असे जोरदार आवाहनही आमदार राणे यांनी दिले आहे.
आमदार नितेश राणे हे गोव्यावरून कणकवलीकडे जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमानचे अध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, मनीष दळवी, सभापती पंकज पेडणेकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, चिपी विमानतळावर बुधवारी ट्रायल विमान उतरवण्यात येणार आहे. मात्र, या विमान उतरण्यास अद्यापपर्यंत केंद्र सरकार किंवा विमान पत्तन विभागाची कोणतीही परवानगी मिळाली नाही. प्रत्यक्षात ६५ परवानग्यांची गरज असताना अद्यापपर्यंत २५ परवानग्या मिळाल्या आहेत. असे असताना मंत्री केसरकर हे स्वत:च्या हट्टासाठी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत.
बुधवारी मुंबईहून येणाऱ्या विमानात पायलट, को-पायलट एवढेच जण असणार आहेत. कोणताही अधिकारी किंवा मंत्री असणार नाही. एवढेच काय, विमान उतरवण्याचा सरकारी कार्यक्रम आहे, असे मंत्री केसरकर भासवत आहेत. तर त्यांनी स्वत: या विमानातून आले पाहिजे होते. ते का येत नाहीत, असा सवाल आमदार राणे यांनी केला आहे. तसेच विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे बुधवारी रात्री मालवणला येत आहेत. मग ते ट्रायल लँडिंगसाठी दुपारी का येत नाहीत? यावरूनच जनतेची फसवणूक करण्याचे काम मंत्री केसरकर यांनी सोडून द्यावे. मी स्वत: याबाबत विमान पत्तनच्या अधिकाºयांशी बोललो आहे. त्यांनी मला सविस्तर माहिती दिली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
जे खासगी विमान उतरणार आहे, त्यातून गणपतीची मूर्तीही आणण्यात येणार आहे. यातून भावनिकतेचे राजकारण करण्याचा मंत्री केसरकर यांचा डाव आहे. आम्ही यातून कोणतेही राजकारण करणार नाही किंवा त्यांना विरोध करणार नाही. जनतेला सर्व काही हळूहळू समजेल. पण चिपी विमानतळावर खासगी उद्योजकांचे विमान उतरत असतील तर आमचेही विमान उतरण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी विमान पत्तन विभागाकडे केली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून चिपीकडे पाहिले जात होते. पण आता विमानतळाची धावपट्टी कमी करण्यात आली आहे. गोव्याचे मोपा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी  चिपी विमानतळाचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. यामागे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असून, ते खºया अर्थाने कोकणचे कसई आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.
चौकट
मंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केली
बांदा येथे आयटी हब आणण्यात आली. मात्र त्याचे मुख्य कार्यालय हे आपल्या इमारतीत ठेवले. जेणे करून आपणास अडीच ते तीन लाख भाडे मिळावे. हीच त्याच्या मागची धारणा आहे. जनतेची बेरोजगारी दूर करण्यापेक्षा मंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केली आहे. एवढी कॉम्प्लेक्स आहे, मग यांना आपलेच कॉम्प्लेक्स कसे काय दिसले, असा सवालही आमदार राणे यांनी केला आहे.

Web Title: Trial landing before the permission of Balhattahata - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.