सिंधुदुर्गात तापमानाचा पारा चाळिशीकडे; उष्ण, दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 22, 2024 05:16 PM2024-03-22T17:16:34+5:302024-03-22T17:18:05+5:30

सिंधुदुर्ग : एप्रिल व मे महिना उंबरठ्यावर असताना मार्च महिन्यातच जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे. कोकण किनारपट्टीवर कमालिचा उन्हाळा ...

the temperature reaches forty In Sindhudurga; Citizens suffer due to hot, humid weather | सिंधुदुर्गात तापमानाचा पारा चाळिशीकडे; उष्ण, दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त

सिंधुदुर्गात तापमानाचा पारा चाळिशीकडे; उष्ण, दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त

सिंधुदुर्ग : एप्रिल व मे महिना उंबरठ्यावर असताना मार्च महिन्यातच जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे. कोकण किनारपट्टीवर कमालिचा उन्हाळा जाणवत असून उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. कमाल तापमाने ३८ अंशांचा पारा गाठला असून उष्ण आणि दमट हवामानामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३९ अंश नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टीवर शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९ व २२ अंशाच्या आसपास राहील. पुढील ४ ते ५ दिवस राज्याच्या अंतर्गत भागांत कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल. कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट स्थिती राहील.

रात्रीचा काहीसा गारवा

रात्रीचे तापमान २२ अशांच्या आसपास घसरत आहे. २१ मार्चच्या रात्री २२ अंशांची नोंद झाली असून दिवसही ३८ अंशावर येऊन ठेपला आहे.

अरबी समुद्रावरून वाहणारे वारे

अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान स्थिर होतात. समुद्री वारे दुपारी स्थिर झाले तर तापतात. आता नेमके हीच परिस्थिती असून, समुद्र वारे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होत आहेत. या गरम वाऱ्यामुळे तापमान अधिक नोंदविले जात आहे.

Web Title: the temperature reaches forty In Sindhudurga; Citizens suffer due to hot, humid weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.