कोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:38 PM2021-07-12T12:38:53+5:302021-07-12T12:40:32+5:30

Rain Konkan Sindhudurg : कोकणात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

The sky was clear in Konkan; The rivers crossed the danger level | कोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

कोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणात आभाळ फाटले; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; मांडुकलीत पाणी भरण्याची शक्यता

वैभववाडी :कोकणात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने नदी नाल्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. बहुतांशी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. तर अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली आहे. तर भुईबावडा, करुळ दोन्हीही घाटमार्ग सद्यस्थितीत सुरक्षित आहेत.

तब्बल दोन आठवड्यांपासून दांडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. सोमवारी पहाटे पावसाचा जोर वाढल्याने नदी नाल्यानी रौद्र रुप धारण केले आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मांडुकलीत पाणी भरण्याची शक्यता आहे.

संततधार पावसामुळे अंतिम टप्प्यातील भात लावणी खोळंबली आहे. शेतीत पाणी शिरल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भुईबावडा पहिलीवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने या वाडीचा संपर्क तुटला आहे.

Web Title: The sky was clear in Konkan; The rivers crossed the danger level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.