सिंधुदुर्ग :रामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:19 PM2018-09-26T14:19:01+5:302018-09-26T14:22:01+5:30

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता रामचंद्रच्या अनेक रंजक कहाण्याही समोर येऊ लागल्या आहेत.

 Sindhudurg: Ramchandra sells clothes for theft, four cases filed in Kudal | सिंधुदुर्ग :रामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल

सिंधुदुर्ग :रामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देरामचंद्र कपडे चोरी करून विकायचा, कुडाळात चार गुन्हे दाखल मुली पुरविण्याच्या धंद्यातही नावाची चर्चा; सामूहिक बलात्कार प्रकरण

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता रामचंद्रच्या अनेक रंजक कहाण्याही समोर येऊ लागल्या आहेत.

रामचंद्र हा आकेरी गावात चोरी करण्यात तरबेज होता. तो जेथे कामाला जाईल तेथे चोरी करायचा. मध्यंतरी त्याचे नाव मुली पुरविण्याच्या धंद्यातही घेतले जात होते. सावंतवाडीत त्याने अनेक दुकानात कपडे चोरी करून आकेरी येथे विकल्याचेही सांगितले जात आहे.

मळगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र घाडी याचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंतचे, पण त्याला पहिल्यापासूनच चोरीचा नाद लागला. वडील मोलमजुरी करीत असल्याने ते आपल्या कामात असत. याचाच फायदा घेऊन रामचंद्र याने आकेरीतून सावंतवाडी गाठली. सावंतवाडीत तो कुणाकडेही मिळेल ते काम करू लागला.

एकाही मालकाकडे तो पाच ते सहा महिन्यांच्यावर राहिला नाही. पण एकदा ओळख झाली की त्याच्यावर त्याची नजर रहायची. म्हणूनच कुणाचे कपडे चोरून ते ठिकठिकाणी नेऊन विकणे, छोट्या-मोठ्या वस्तू विकणे अशामध्ये तो माहीर होता.

जसजसा तो मोठा झाला तशी त्याने आपली एक टोळी बनवली. त्यातून तीन ते चार जण एकत्र येऊन चोरी करायचे. पण रामचंद्रच्या नादाला लागलो तर आपले काही खरे नाही म्हणून रामचंद्रचा नाद त्यांनी सोडला. त्यानंतर रामचंद्र मोठमोठ्या चोऱ्या करू लागला.

रात्रीची घरफोडी असो अगर कोणाचे बंद घर फोडण्याचे काम असो, अशी कामे करू लागला. चोरी करायची झाली तर तो स्वत:ची दुचाकी वापरत नसे. तो हात दाखवून कोणाच्या तरी दुचाकीवर बसत असे व काम करून येत असे.

कुडाळ पोलीस ठाण्यात रामचंद्रवर तब्बल तीन ते चार गुन्हे आहेत. हे सर्व गुन्हे चोरीचेच असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आकेरीसह सावंतवाडीमध्ये मध्यंतरी मुली पुरविणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा होती. त्यातही रामचंद्र याचे नाव घेतले जात होते. पण तो प्रत्यक्षात सापडला नाही आणि पोलिसांकडेही कोणी तक्रार न केल्याने पुढे तपास केला नाही.

 रामचंद्र हा सराईत गुन्हेगार असला तरी तो आकेरीत चोरी करीत नसे. सावंतवाडी, कुडाळ तसेच अन्य ठिकाणी चोºया करीत होता. त्याची मळगाव येथील प्रशांत व राकेश यांच्याशी तशी जुनी ओळख होती. मात्र या राऊळ बंधूंना कधी आकेरीत रामचंद्रबरोबर कोणी पाहिले नाही. हे तिघे बाहेर भेटायचे. त्यातून त्यांची मैत्री घट्ट झाली होती. शुक्रवारी मळगाव येथील हॉटेल हे या राऊळ बंधूनीच दाखविल्याचे बोलले जात आहे.

रामचंद्रने एकाचवेळी दोन दुचाकी विकत घेतल्या

सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र याने एक वर्षापूर्वी एकाच वेळी दोन दुचाकी विकत घेतल्या होत्या. या दोन्ही दुचाकी नव्याकोºया होत्या. याचे गौडबंगाल अद्यापपर्यंत उलगडले नाही. नंतर त्याने यातील एक दुचाकी विकली आणि दुसरी दुचाकी घेतली. सध्या त्याच्याजवळ दोन दुचाकी होत्या. त्यातील एक दुचाकी गुन्ह्यात वापरल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

लग्न केले पण पत्नी अल्पावधीतच सोडून गेली

सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रामचंद्र याने मुंबईतील तरूणीशी विवाह केला होता. ती तरूणी काही महिने रामचंद्रकडे आकेरी येथे येऊन राहिलीही होती. पण तिला रामचंद्र हा मारहाण करत होता. तसेच तो चोरी करीत असल्याचे तिला समजल्यानंतर तिने त्याला सोडून दिल्याचे गावात सांगत आहेत.

Web Title:  Sindhudurg: Ramchandra sells clothes for theft, four cases filed in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.