सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:04 PM2018-04-17T17:04:34+5:302018-04-17T17:04:34+5:30

जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याचदरम्यान कोकण वधू-वर मेळावाही घेण्यात येणार आहे.

Sindhudurg: Janakalyan Pratishthan commenced on April 19, at Konkan Festival in Pune | सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ

सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ

Next
ठळक मुद्देजनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात आयोजन

तळेरे : जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याचदरम्यान कोकण वधू-वर मेळावाही घेण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, कोकण महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची सुरुवात १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेने होणार आहे.

या शोभायात्रेत कोकणी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ही शोभायात्रा भोसरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन अंकुशराव लांडगे नाट्यगृहात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत दशावतार कालिया मर्दनचा या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

दशावतार, शक्तीतुरा, संगीत भजनाचा डबलबारी सामना, मालवणी एकांकिका अशा विविध कार्यक्रमांनी महोत्सव रंगणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांना कोकणभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वयंवर वधू-वर सूचक वेबसाईटचे उद्घाटन नारायण राणे व भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित राहणार आहेत. समारोप रविवार २२ एप्रिलला दुपारी ३ वाजता वधू-वर मेळाव्याने होणार आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक सचिन चिखले, विरोधी पक्षनेते योगेश बहल उपस्थित राहणार आहे.

कोकणी संस्कृतीसाठी विशेष आवाहन

कोकणातील विविध लोकसंस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे स्टॉल उभारायचे असतील तर अशा व्यक्ती अथवा संस्थांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले आहे. अशा सर्वांना स्टॉल व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रविवारी पावणे इले रे मालवणी एकांकिका सादर होणार आहे.
 

Web Title: Sindhudurg: Janakalyan Pratishthan commenced on April 19, at Konkan Festival in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.