सिंधुदुर्ग :  रेशनकार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 03:43 PM2018-10-10T15:43:53+5:302018-10-10T15:45:10+5:30

देवगड तहसील कार्यालयात सध्या रेशनकार्ड संदभार्तील कामे अनेक दिवसांपासुन प्रलंबित आहेत.यामुळे जनतेची गैरसोय होताना दिसुन येत आहे. यामुळे सदर प्रश्न तातडीने सोडविण्याबाबतची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी देवगड तहसिलदार मारुती कांंबळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Sindhudurg: Demand for resolving queries related to ration cards promptly | सिंधुदुर्ग :  रेशनकार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

सिंधुदुर्ग :  रेशनकार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

ठळक मुद्देरेशनकार्ड संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणीदेवगड तहसील कार्यालयात अनेक कामे प्रलंबित

देवगड : देवगड तहसील कार्यालयात सध्या रेशनकार्ड संदभार्तील कामे अनेक दिवसांपासुन प्रलंबित आहेत.यामुळे जनतेची गैरसोय होताना दिसुन येत आहे. यामुळे सदर प्रश्न तातडीने सोडविण्याबाबतची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी देवगड तहसिलदार मारुती कांंबळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनामध्ये असे नमुद करण्यात आले आहे कि, रेशनकार्डवर नवीन नाव दाखल करणे,नाव कमी करणे,नवीन रेशनकार्ड बनविणे इत्यादी कामे अनेक दिवसांपासुन प्रलंबित असल्यामुळे देवगड तालुक्यातील जनतेची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.ही बाब जनतेच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधीत असल्यामुळे याबाबत आपण स्वत:लक्ष घालून योग्य ती कारवाइ्र करावी तसेच सदर प्रकियेस विलंब का होत आहे याची रितसर माहिती कृपया भाजपा कार्यालय देवगड येथे कळविण्यात यावी. तसेच रेशनकार्डवर त्या घरातील लहान मुलाचे किंवा नवीन लग्न होउन आलेल्या सदस्याचे नाव दाखल करावयाचे झाले तर तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी केली जाते.त्यामुळे नवीन नाव दाखल करताना अनेक अडचणी निर्माण होतात.ही अट कृपया शिथील करण्यात यावी जेणेकरुन सामन्य जनतेची होत असलेली गैरसोय दुर होण्यास मदत होईल.तरी याबाबत याबाबत आपण स्वत: लक्ष घालून सदर प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी निवेदनाव्दारे देवगड तहसिलदार मारुती कांंबळे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Sindhudurg: Demand for resolving queries related to ration cards promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.