अनधिकृत गौण उत्खनन, पाचपट दंडासह साडेसात लाखापर्यंत दंडाची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 07:41 PM2017-11-02T19:41:55+5:302017-11-02T19:42:07+5:30

गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व  वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.

Provision of fine for unauthorized minor excavation, up to Rs | अनधिकृत गौण उत्खनन, पाचपट दंडासह साडेसात लाखापर्यंत दंडाची तरतूद

अनधिकृत गौण उत्खनन, पाचपट दंडासह साडेसात लाखापर्यंत दंडाची तरतूद

Next

मालवण : गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व  वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. गौण खनिज उत्खनन नियमातील निकषात बदल करत अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणा-यांवर पाच पट दंडासह साडेसात लाख रुपयांपर्यंत दंड लावला जाणार आहे. त्यानंतर अनधिकृत वापरासाठी वापर असल्यास संबंधित व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, मालवण तालुक्यात कर्ली व कालावल खाडी पात्रासह अन्य भागातही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जाते. अनधिकृतरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असलेल्या ठिकाणाहून महसूल विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वाळू उत्खनन मार्गावर विशेष महसूल पथके पोलीस बंदोबस्तासह नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.  

गौण खनिज उत्खनन प्रक्रिया नियमात अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. रॉयल्टीमध्ये सवलत देण्यात आली असली तरी शासनाने सवलती देताना अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर कठोर निर्बंध  घातले आहेत. उत्खननाबाबतचा कोणताही अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अनधिकृत गौण खनिज उत्खनन तसेच वाहतूक करणाºयांवर कडक धोरण निश्चित करण्यात आल्याने अनधिकृतवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने ही कारवाई करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

साडे सात लाखांपर्यंत दंडाची तरतूद
गौण खनिज अनधिकृत उत्खनन व वाहतूक करताना वापरण्यात येणारी यंत्र सामुग्री, साधन सामुग्री, व वाहतूक साधने याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार दंडाची रक्कम नव्याने निश्चित करण्यात आली आहे. यात २५ हजारांपासून साडेसात लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यात ड्रील मशीनचा वापर - २५ हजार दंड, ट्रक्टर, ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पंप यांचा वापर - १ लाख दंड, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कंप्रेसर याचा वापर- २  लाख दंड, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज बोट यांचा वापर - ५ लाख रुपये दंड, तसेच मोठी सामग्री एक्स केव्हेटर व मेकेनाईजचा वापर झाल्यास ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. 

अनधिकृत आढळ्यास मालमत्ताही घेणार ताब्यात
अनधिकृतरित्या गौण खनिज, वाळू उत्खनन किंवा वाहतूक करताना सापडून आल्यास गौण खनिजाच्या पाच पट दंड तसेच यंत्रसामुग्री व वाहनावर नव्या नियमानुसार दंड होणारच आहे. तसेच वैयक्तिक जातमुचलका जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करून पुन्हा अनधिकृत उत्खनन वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट करावे लागणार असून तारण म्हणून घर, जमीन, राष्ट्रीयकृत बँकाची हमी द्यावी लागणार आहे. दुस-यावेळी अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक करताना आढळल्यास साधन सामुग्री व वाहतुकीच्या साधनासह मालमत्ताही ताब्यात घेतल्या जाणार आहेत.

Read in English

Web Title: Provision of fine for unauthorized minor excavation, up to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.