महामार्गावर धोकादायक ठिकाणी पोलीस गस्त सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:43 PM2019-07-15T14:43:57+5:302019-07-15T14:45:12+5:30

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि महामार्गाचे काम या पार्श्वभूमीवर महामार्गावरील धोकादायक ठिकाणी तसेच काम सुरू ...

Police patrol in dangerous places on the highway continues | महामार्गावर धोकादायक ठिकाणी पोलीस गस्त सुरू

महामार्गावरून सीट बेल्ट, हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाहतूक पोलिसांकडून पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव, संजय डौर व कर्मचारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमहामार्गावर धोकादायक ठिकाणी पोलीस गस्त सुरूमुसळधार पाऊस, महामार्गाचे काम या पार्श्वभूमीवर सतर्कता

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि महामार्गाचे काम या पार्श्वभूमीवर महामार्गावरील धोकादायक ठिकाणी तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार महामार्गावरील धोकादायक ठिकाणे व खराब काम असलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. याठिकाणी अपघात होऊ नयेत तसेच दुचाकी चालकांना सहकार्य करण्यासाठी पोलिसांची गस्त तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जाधव म्हणाले, महामार्गावरील अपघात रोखणे व वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी महामार्गावर मद्य प्राशन करून वाहन चालवणे, सिटबेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊन अपघात होऊ नये व अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी, यासाठीही पोलीस गस्त ठेवण्यात आली असल्याचे प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, कणकवली, कसाल यांनी कळविले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने व महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

 

Web Title: Police patrol in dangerous places on the highway continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.