मुंबई- गोवा महामार्गावर ट्रक चालकला माराहाण, रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:07 AM2017-11-26T01:07:23+5:302017-11-26T01:07:44+5:30

मुंबई गोवा महामार्गावरील गोव्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणा-या ट्रक चालकाला  झाराप तिट्टा येथे लाठ्या-काठ्यानी माराहाण केली ही घटना शनिवारी रात्री 11.45 च्या सुमारास घडली. 

On the Mumbai-Goa highway, the driver of the truck was shot dead in the hospital | मुंबई- गोवा महामार्गावर ट्रक चालकला माराहाण, रुग्णालयात दाखल

मुंबई- गोवा महामार्गावर ट्रक चालकला माराहाण, रुग्णालयात दाखल

Next

सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गावरील गोव्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणा-या ट्रक चालकाला  झाराप तिट्टा येथे लाठ्या-काठ्यानी माराहाण केली ही घटना शनिवारी रात्री 11.45 च्या सुमारास घडली. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून बेशुध्द अवस्थेत त्याला कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मारहाण करणारे दोघेजण दुचाकीवरून आले होते. घटना घडल्यानंतर तर घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झालयाने ते दोघेजण पळून गेले. त्यामुळे हा प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी की,  गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक झाराप येथे आला असता त्याच वेळी तेथे एका दुचाकीवरून दोघे जण आले आणि त्यांनी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा करत लाठ्या काठ्यानी माराहाण केली. या मारहाणीत ट्रक चालक गंभीर जखमी झाला व ट्रक मध्येच बेशुध्द अवस्थेत पडला. या  माराहाणीचा आवाज ऐकूण ग्रामस्थ रस्त्यावर आले त्यामुळे माराहाण करणारे युवक पळून गेले ग्रामस्थानी यांची माहिती कुडाळ पोलिसांना दिली. कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी  गंभीर जखमी झालेल्या चालकाला रूग्णालयात दाखल केले. मात्र तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता त्यामुळे ही घटना कशामुळे घडली याचा उलगडा झाला नव्हता. पोलीस स्थानिक ग्रामस्थाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी तसेच लाठ्या-काठ्या जप्त केल्या आहेत.

Web Title: On the Mumbai-Goa highway, the driver of the truck was shot dead in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा