'यात्रोत्सवा'तून मालवण आगाराला ११ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:04 AM2019-03-12T11:04:41+5:302019-03-12T11:06:56+5:30

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

Malvan Agar generated a revenue of 11 lakh from Yatotsav | 'यात्रोत्सवा'तून मालवण आगाराला ११ लाखांचे उत्पन्न

'यात्रोत्सवा'तून मालवण आगाराला ११ लाखांचे उत्पन्न

Next
ठळक मुद्देआगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली माहिती प्रवासी संख्येत घट मात्र भारमानात काहीअंशी वाढ

मालवण : आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात नियोजन करण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला ११ लाख १७ हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता ७५ हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

मालवण आगारातून आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. आंगणेवाडी मार्गावर २४ ते २६ फेब्रुवारीपर्यंत ७८० फेऱ्या सोडण्यात आल्या. यात ३७ हजार ६९७ प्रवाशांनी लाभ घेतला. 

कुणकेश्वर मार्गावर ४ ते ६ मार्च या कालावधीत एसटीच्या ३०४ बस फे?्यातून १४ हजार ६५० प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षी दोन्ही यात्रोत्सवास सुमारे ५७ हजार ५६८ प्रवाशांनी लाभ घेतला यावर्षी मात्र पाच हजाराने घट होऊन ५२ हजार ३४७ प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.

आंगणेवाडीला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, टोपीवाला हायस्कुल, देवबाग, वराड, तळगाव, तिरवडे, कट्टा, पोईप, खालची देवली, आंबेरी मसुरे, डांगमोडे या ठिकाणावरून बसफेºया सोडण्यात आल्या होत्या.

आंगणेवाडी यात्रोत्सवातून मालवण आगाराला ६ लाख ६७ हजार ९३५ रुपयाचे उत्पन्न मिळाले. तर कुणकेश्वरला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, आचरा, आडबंदर, मोर्वे, मिठबाव, तांबळडेग, कातवण या मार्गावर एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते.

कुणकेश्वर यात्रोत्सवातून ४ लाख ४९ हजार २९१ रुपयाचे उत्पन्न मिळाले. याशिवाय मुंबई, पुणे मार्गावरही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते, असे बोधे यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सेवेसाठी..

आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, वाहक व मेकॅनीक, अन्य कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन प्रवाशांना चांगली सेवा दिली. यात्रोत्सवात काळात चालक संतोष पाटील, रवी राणे, दीपक ढोलम यांच्यासह अन्य चालकांनी आपल्या ताब्यातील बस सजवून प्रवाशांना चांगली सेवा देताना प्रवाशांना प्रवास कंटाळवाना होऊ नये यासाठी मराठी, हिंदी, देशभक्तीपर गीतांची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Malvan Agar generated a revenue of 11 lakh from Yatotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.