कणकवली: माजी नगरसेविका वैशाली आरोलकर यांचा भाजपामध्ये प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 02:01 PM2017-11-05T14:01:06+5:302017-11-05T14:01:27+5:30

शहरातील तेलीआळी येथील माजी नगरसेविका वैशाली आरोलकर यांनी भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला .

Kankavali: Former corporator Vaishali Arolkar is in the BJP | कणकवली: माजी नगरसेविका वैशाली आरोलकर यांचा भाजपामध्ये प्रवेश 

कणकवली: माजी नगरसेविका वैशाली आरोलकर यांचा भाजपामध्ये प्रवेश 

Next

कणकवली:  शहरातील तेलीआळी येथील माजी नगरसेविका वैशाली आरोलकर यांनी भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला . कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे .  

सन २००८ ते २०१३ या कालावधीत नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत  त्या काँग्रेस पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या . या पदाचा अनुभव असल्याने त्याना पुन्हा एकदा भाजप पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे . यावेळी संदेश पारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे  पक्षात स्वागत केले .

या प्रवेशावेळी जेष्ठ नागरिक बबन नेरकर ,वैभव आरोलकर ,गौरव हर्णे ,प्रसाद अंधारी ,बाळा वराडकर ,सुनील निकम ,गणेश नेरकर ,संतोष ठाणेकर ,उर्मिला जावडेकर ,सागर जावडेकर ,आदी उपस्थित होते . 

 

Web Title: Kankavali: Former corporator Vaishali Arolkar is in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा