सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:07 PM2017-10-11T17:07:36+5:302017-10-11T17:08:56+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबर रोजी होणाºया ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. २ हजार २६० बॅलेट युनिट व १ हजार १३२ कंट्रोल युनिटची तपासणी करून ही यंत्रे सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आली आहेत.

Available equipment for election of Gram Panchayat in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रे उपलब्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रे उपलब्ध

Next

ओरोस,11 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबर रोजी होणाºया  ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. २ हजार २६० बॅलेट युनिट व १ हजार १३२ कंट्रोल युनिटची तपासणी करून ही यंत्रे सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आली आहेत.

निवडणूक कर्मचाºयांच्या नियुक्त्या तालुकावार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
१६ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आता सरपंच पदासाठी ८३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३५२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १६ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून याकरीता २२६० बॅलेट युनिट व ११३२ कंट्रोल युनिट उपलब्ध करण्यात येऊन सर्व मतदान यंत्रे तालुकावर वितरित करण्यात आली आहेत.

Web Title: Available equipment for election of Gram Panchayat in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.