कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 03:47 PM2021-07-07T15:47:32+5:302021-07-07T15:49:10+5:30

Crimenews Sindhudurg : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात खिसा रिकामी झाला आणि त्यातच एजंटने पैसे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घडली आहे. त्या तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Attempted suicide of a youth through financial transactions in Kalamath | कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नपालकांनी लक्ष देणे गरजेचे

कणकवली : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात खिसा रिकामी झाला आणि त्यातच एजंटने पैसे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घडली आहे. त्या तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेला विविध प्रकारचा जुगार आणि त्यातून बरबाद होणारी युवा पिढी यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलीकडे युवा पिढीतील अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन विविध प्रकारचे जुगार खेळत शॉर्टकट इझी मनी मिळवण्यामागे लागलेले दिसून येतात.

पालकांनी लक्ष देणे गरजेचे

अशा जुगारात एकाला ठेच लागली तरी इतर काही लवकर शहाणे होताना दिसत नाहीत. १०पैकी एखाद्याला जेव्हा जुगारात पैसे मिळतात तेव्हा बाकीचे ९ जण पैसे गमावून बसलेले असतात. जुगारात गमावलेल्या पैशांना सूट नसते. ते पैसे वसूल करण्यासाठी मग एजंट तगादा लावतात.पैसे देऊ शकत नसल्यामुळे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून जुगार खेळणारे तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा जुगाराची पाळेमुळे उखडून काढून त्याला पायबंद घालण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. तसेच पालकांनी आपली मुले नेमके काय करतात? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Attempted suicide of a youth through financial transactions in Kalamath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.