मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

By admin | Published: May 27, 2016 10:01 PM2016-05-27T22:01:08+5:302016-05-27T22:19:06+5:30

जिल्हा प्रशासनाची स्वच्छता मोहीम : चार भागांत कचऱ्याचे वर्गीकरण

12 shores cleanliness in Malvan | मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

मालवणातील १२ किनाऱ्यांची स्वच्छता

Next

मालवण : किनारा स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालवण तालुक्यातील बारा किनाऱ्यांवर ही मोहीम राबविण्यात आली. यात आचरा, पारवाडी, हिर्लेवाडी, तोंडवळी, सर्जेकोट, देवबाग, तारकर्ली, मालवण चिवला बीच, मालवण बंदर जेटी, वायंगणी, कोळंब, रेवंडी, वायरी भूतनाथ येथील १२ बीच कचरामुक्त करण्यात आले.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसहभागाच्या सहकार्याने गुरुवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता या किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ मालवण चिवला बीच येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी शेखर सिंह, तहसीलदार वनिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहायक गटविकास अधिकारी विजय परीट, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, महेश जावकर, मोहन वराडकर, विजय परीट, यासह अन्य उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल्स, तुटलेली जाळी, मासेमारीतील निकामी साहित्य, अशा विविध प्रकारचा कचरा विविध रंगांच्या पिशव्यांमध्ये एकत्र करत ओला कचरा, प्लास्टिक कचरा, सुका कचरा काचेच्या वस्तू अशा चार भागात गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नगरपालिका,
ग्रामपंचायतींचाही सहभाग
यात शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हा परिषद महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, आदी शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. तर या मोहिमेत लोकप्रतिनिधी, नागरिकांसह मालवण पत्रकार समिती, तालुका फोटोग्राफर असोसिएशन स्वयंसेवी संघटना व अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी
झाले होते. समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या प्रमाणात कचरा स्वच्छ केल्याने समुद्र किनारे लखलखीत बनले आहेत.


आचरा आचरा किनारी स्वच्छता मोहीम: आचरा किनारऱ्यावर गुरूवारी सकाळी ७ वाजता आचरा किनारा साफ करण्याची मोहीम राबवली. यामध्ये १४0 जणांनी सहभाग घेतला होता.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभागाच्या पद्मजा चव्हाण, मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, सरपंच साक्षी ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका, आचरा ग्रामस्थ, आचरा यशराज संघटना ग्रुप व मान्यवर सामिल झाले होते.

Web Title: 12 shores cleanliness in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.