लैंगिक जीवन : मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्याने शरीरात होतात हे बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 03:35 PM2019-02-26T15:35:24+5:302019-02-26T15:35:30+5:30

अनेकांना असं वाटतं की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवू नये कारण यावेळी असं काही केलं पार्टनर एन्जॉय करू शकत नाही आणि सगळंच विचित्र वाटतं.

Weird changes that happen during periods sex | लैंगिक जीवन : मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्याने शरीरात होतात हे बदल!

लैंगिक जीवन : मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्याने शरीरात होतात हे बदल!

अनेकांना असं वाटतं की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवू नये कारण यावेळी असं काही केलं पार्टनर एन्जॉय करू शकत नाही आणि सगळंच विचित्र वाटतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर तज्ज्ञ सांगतात की, मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे ही एक सामान्य बाब आहे. जर तुम्ही कधी असं केलं नसेल तर नक्कीच ट्राय करायला हवं. कारण मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात काही विचित्र बदल होतात.

लुब्रिकेशनची गरज पडत नाही

जर सामान्य दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवले अनेकदा तुम्हाला लुब्रिकेशनची गरज असते. पण मासिक पाळीदरम्यान याची गरज पडत नाही. गुप्तांगामधून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे भरपूर ओलावा राहतो. त्यामुळे यावेळी शारीरिक संबंध ठेवले तर घर्षणाची समस्या होत नाही. 

मासिक पाळीचे दिवस होतात कमी 

जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला हे जाणवेल की, तुमचं मासिक पाळी चक्र छोटं आणि हलकं झालं आहे. याचं कारण आहे इन्डॉर्फिन आणि प्रॉस्टाग्लॅन्डिनसारखे हार्मोन्स रिलीज होतात. 

क्रॅम्प्समध्ये आराम

मासिक पाळीदरम्यान क्रॅम्प्स आल्यावर किती त्रास होतो हे तुम्हाला नक्कीच चांगलं माहीत असेल. अशात जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला क्रॅम्प्सपासून आराम मिळू शकतो. कारण ऑर्गॅज्म झाल्यावर मेंदू इंडॉर्फिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. याला फील गुड हार्मोनही म्हटलं जातं. हा हार्मोन रिलीज झाल्यावर क्रॅम्प्सची इंटेसिटी कमी होते. 

प्रेग्नन्सीची भीती

जर तुम्हाला वाटत असेल की, मासिक पाळीदरम्यास शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेग्नन्सीची भीती पूर्णपणे दूर होते, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी असते. पण ती पूर्णपणे दूर होत नाही. 

जास्त लैंगिक इच्छा

मासिक पाळीदरम्यान तुमची कामेच्छा कशी आहे, मासिक पाळी चक्र कसं आहे हे वेगवेगळ्या गोष्टींवर ठरतं. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंधाने जास्त आनंद मिळतो. कारण मासिक पाळीदरम्यान त्यांची उत्तेजना वाढलेली असते. 

Web Title: Weird changes that happen during periods sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.