पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:31 PM2018-12-12T16:31:39+5:302018-12-12T16:34:30+5:30

वैवाहिक जीवनाला सुरुवात करतानाही पहिल्या रात्री दोघांनी अनेक प्रश्नांनी वेढा घातलेला असतो.

Tips for first time sex for women | पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी!

पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना घ्यावयाची काळजी!

Next

(Image Credit : www.health24.com)

शारीरिक संबंधांबाबत सामान्यपणे परिवारात कमीच चर्चा होते. पण इंटरनेटच्या माध्यमातून उत्तरे मिळत असल्याने अलिकडे तरुणांमध्ये याबाबत काही प्रमाणात जागरुकता बघायला मिळते. पण तरीही त्यांच्यात अतिउत्साह असल्याने अनेकदा अनेक चुका केल्या जातात.

वैवाहिक जीवनाला सुरुवात करतानाही पहिल्या रात्री दोघांनी अनेक प्रश्नांनी वेढा घातलेला असतो. त्यामुळे पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत आजही अनेकांमध्ये संभ्रमता बघायला मिळते. त्यामुळे वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना आणि पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

स्वत:ला विचार हा प्रश्न

पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना स्वत:ला हा प्रश्न विचारा की, खरंच आता तुम्ही यासाठी तयार आहात का? तुम्ही कुणाच्या दबावात तर हे करत नाही आहात ना? ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही नात्याचा या वळणावर तेव्हाच आलात, जेव्हा तुम्ही खरंच यासाठी तयार आहात. त्यामुळे आधी मनाशी संवाद साधा आणि त्यानंतर हे नातं पुढच्या टप्प्यावर घेऊन जा.

प्रोटेक्शन विसरु नका

तुमचा जोडीदार कितीही उत्साही असू द्या, पण पहिल्यांदा प्रोटेक्शनशिवाय शारीरिक संबंध ठेवू नका. प्रोटेक्शनचा कोणता प्रकारचा वापरायचा आहे, हे तुम्ही पार्टनरसोबत बोलून ठरवू शकता. 

सहज नसाल तर थांबा

शारीरिक संबंध ठेवताना जर तुम्ही सहज नसाल किंवा तुम्हाला फार अवघडल्यासारखं वाटत असेल तर जोडीदाराला थांबायला सांगा. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना अनेक गोष्टी माहीत नसल्याने किंवा सहजता नसल्याने उत्साह कमी होतो. पण शारीरिक संबंध ठेवताना दोघेही समान सहज असणे गरजेचे आहे. त्याशिवाय दोघांनाही याचा आनंद घेता येणार नाही. 

कमी होतील वेदना

पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना वेदना होऊ शकतात. पण हा त्रास किंवा वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकता. शारीरिक संबंध ठेवण्याआधी महिला गरम पाण्याने आंघोळ करु शकता. याने गुप्तांग रिलॅक्स होईल. याने दोघांनाही वेदना होणार नाही. 

सगळे विचार बाजूला ठेवा

पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना मनात वेगवेगळे विचार येणे सामान्य आहे. पण याने तुम्हा दोघांनाही मिळणाऱ्या आनंदात मिठाचा खडा पडू शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि जोडीदारावर लक्ष केंद्रीत करा. डोकं शांत ठेवून या गोष्टीला सामोरं जाल तरच तुम्हाला याचा चांगला अनुभव घेता येईल आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखकर होईल.  
 

Web Title: Tips for first time sex for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.