लैंगिक जीवनात अनेकांना करावा लागतो 'या' कॉमन समस्यांचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 02:42 PM2019-01-04T14:42:54+5:302019-01-04T14:43:45+5:30

प्रत्येक जोडीदारांच्या वैवाहिक आयुष्यात अशी एक वेळ नक्की येत, जेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंधाशी निगडीत मुद्द्यांवर सहमती होत नाही.

These are the common sexual problems couple face | लैंगिक जीवनात अनेकांना करावा लागतो 'या' कॉमन समस्यांचा सामना!

लैंगिक जीवनात अनेकांना करावा लागतो 'या' कॉमन समस्यांचा सामना!

Next

प्रत्येक जोडीदारांच्या वैवाहिक आयुष्यात अशी एक वेळ नक्की येत, जेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंधाशी निगडीत मुद्द्यांवर सहमती होत नाही. अशात त्यांच्यात यावरुन काहीना काही वाद होतात. कधी कधी बेडरुममधील हा वाद इतका वाढतो की, जोडीदार एकमेकांना सहनही करु शकत नाहीत. तज्ज्ञ सांगतात की, जास्तीत जास्त लैंगिक विषयासंबंधी समस्या या नॉन सेक्शुअल कारणांनी होतात. तज्ज्ञांनुसार, लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये खासकरुन जोडीदारांना खालील प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

लैंगिक क्षमता

या समस्येचा कोणत्याही नात्यावर फार जास्त काळासाठी प्रभाव राहतो. उदाहरणार्थ तुमची लैंगिक क्षमता जास्त असेल आणि तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे असतील. पण असही होऊ शकतं की, तुमच्या जोडीदाराची लैंगिक क्षमता कमी असेल आणि तुमच्या होकारावर काही प्रतिक्रियाच देत नाही. हा फरक असल्याने अडचण समजून घेण्याऐवजी जोडीदारांमध्ये वाद होतात.   

पुढाकार न घेणे

ज्या जोडप्यांनी त्यांचं लैंगिक जीवन नुकतंच सुरु केलं असेल त्यांच्यासाठी ही मोठी समस्या ठरु शकते. याला कम्युकेशनची कमतरता म्हणा किंवा वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकता....दोघांपैकी कुणी कधी आणि कितीवेळा लैंगिक क्रियेसाठी पुढाकार घ्यावा यावर कधीच कुणी बोलत नाही. पुढाकार न घेणे याला तुमची/तुमचा पार्टनर शारीरिक संबंधात रस नसणे असंही समजू शकतो. यानंतर दोघांमध्ये समस्या सुरु होतात. 

दोघांचा दृष्टीकोन

शारीरिक संबंधाबाबत दोघांचाही दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला काहीतरी नवीन प्रयोग करायचा असेल आणि तुमचा जोडीदार केवळ भावनात्मक स्तरावर फोकस करत असेल तर दोघांमध्ये समस्या होऊ शकते. अशावेळी दोघांनीही संवादातून ही समस्या सोडवणे आणि योग्य ते पर्याय निवडणे योग्य ठरते. 

काही गोष्टींची भीती

अनेक लोक असे असतात जे शारीरिक संबंधाबाबत आधीच इतकं काही वाचतात की, त्यांच्या मनात संभ्रमता तयार होते. उदाहरणार्थ दोघांपैकी एकाला काही करायचं, पण त्या गोष्टीबाबत दुसऱ्या जोडीदाराच्या मनात साशंकता किंवा भीती असू शकते. तसेच दोघांपैकी एकाला मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे हानिकारक वाटत असेल आणि दुसऱ्याला तसं करायचं असू शकतं. पण तसं नाही झालं तर वाद होतात. अशावेळी संवाद महत्त्वाचा ठरतो. 

Web Title: These are the common sexual problems couple face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.