लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे महिला ऑर्गॅज्मच्या आनंदापासून राहतात दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:49 PM2019-03-13T15:49:49+5:302019-03-13T15:50:52+5:30

शारीरिक संबंधादरम्यान जास्तीत जास्त महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव येत नाही. ऑर्गॅज्मचा अनुभव न होण्याची वेगवेगळी कारणे असतात.

These are 6 reasons women are not getting orgasm during sex | लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे महिला ऑर्गॅज्मच्या आनंदापासून राहतात दूर!

लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे महिला ऑर्गॅज्मच्या आनंदापासून राहतात दूर!

Next

शारीरिक संबंधादरम्यान जास्तीत जास्त महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव येत नाही. ऑर्गॅज्मचा अनुभव न होण्याची वेगवेगळी कारणे असतात. मात्र जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये यासाठी महिला काही खास प्रयत्न करताना दिसत नाहीत. ऑर्गॅज्म झाल्यावर शारीरिक संबंधादरम्यान संतुष्टीचा अनुभव होतो. पण ऑर्गॅज्मचा अनुभव न होण्याची काही कारणे thehealthsite.com ने दिल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे सांगता येतील. 

डेस्क जॉब

ज्या महिला डेस्क जॉब करतात, त्यांच्या पेल्विक मसल्स शॉर्ट होऊ लागतात. ज्यामुळे त्यांच्या पेल्विकमध्ये वेदना होतात. पेल्विकमध्ये होणाऱ्या वेदना या ऑर्गॅज्ममध्ये अडचण आणतात. त्यासाठी कामाच्या अधेमधे ब्रेक घ्यायला हवा. याने पेल्विक मसल्स मजबूत होतात.

हाय हिल्स

हाय हिल्स वापरल्याने सुद्धा तुम्ही ऑर्गॅज्मचा अनुभव घेऊ शकत नाहीत. पायांच्या सोअस मसल्स पेल्विक नर्व्सशी जुळलेल्या असतात. ज्या डॅमेज झाल्यामुळे ऑर्गॅज्मचा सिग्नल तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही. 

गप्प राहणे

जर तुम्ही शारीरिक संबंधादरम्यान गप्प राहत असाल म्हणजेच तुम्ही काहीही आवाज करत नसाल तेव्हाही तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळू शकत नाही. अशावेळी शारीरिक संबंधावेळी आवाज करणे ऑर्गॅज्मचा अनुभव मिळवण्यासाठी फार गरजेचा असतो. आवाज केल्याने ऑर्गॅज्म लवकर आणि जास्त वेळ मिळतो. 

गर्भनिरोधक गोळ्या

औषधांमध्ये असलेलं प्रोलॅक्टिन एक असं तत्त्व आहे ज्याने कामेच्छा कमजोर होते. ब्लड प्रेशर किंवा कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्यांचं सतत सेवन केल्याने शारीरिक संबंधातील रस कमी होऊ लागतो. याने ऑर्गॅज्मचा अनुभव मिळण्यातही बाधा येते. अशा स्थितीला दूर करण्यासाठी सेक्स थेरपीस्ट महिलांना लुब्रिकंटचा वापर करण्याचा सल्ला देतात. 

ऑक्सीटोसिन लेव्हल कमी होणे

एक्सपर्ट्सनुसार, ऑर्गॅज्मसाठी 'फील गुड' किंवा 'लव्ह हार्मोन' म्हटला जाणारा ऑक्सीटोसिन हार्मोनचं प्रमाण फार महत्त्वाचं ठरतं. जर तुमच्या शरीरात याचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव होण्यास अडचण होऊ शकते. तुमच्यातही हे हार्मोन्स फार कमी असतील तर पार्टनरसोबत जास्त वेळ घालवा त्यांना किस करा, मिठीत घ्या. याने हार्मोन्सचं निर्माण वाढेल. 

ब्लॅडर भरलेलं तर नाही ना?

शारीरिक संबंधानंतर लघवी केल्याने तुम्ही यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून दूर राहता. याचप्रमाणे शारीरिक संबंधाआधीही ब्लॅडर रिकामं करून तुम्ही ऑर्गॅज्मचा अनुभव घेऊ शकता. जेव्हा ब्लॅडर भरलेलं असतं तेव्हा ऑर्गॅज्मची फिलींग लवकर येत नाही. त्यामुळे शारीरिक संबंधाआधी लघवी करावी.

Web Title: These are 6 reasons women are not getting orgasm during sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.