लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:26 PM2019-01-23T15:26:48+5:302019-01-23T15:27:50+5:30

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि गर्भधारणा रोखण्यासाठी तसेच चांगल्या सेक्शुअल हेल्थसाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर महत्त्वाचा ठरतो.

Sexual life: Are you using the right size condom? | लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का?

लैंगिक जीवन : तुम्ही योग्य साइजच्या कंडोमचा वापर करताय का?

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि गर्भधारणा रोखण्यासाठी तसेच चांगल्या सेक्शुअल हेल्थसाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर महत्त्वाचा ठरतो. पण जर तुम्ही योग्य कंडोम आणि योग्य साइजच्या कंडोमचा वापर करत नसाल तर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मोठ्या साइजचा कंडोम वापरत असाल तो घसरण्याची किंवा सतत निसटून जाण्याची शक्यता अधिक असते आणि जर लहान कंडोमचा वापर करत असाल तर तो इंटरकोर्सवेळी फाटण्याची शक्यता असते. अशात कंडोम वापरुन शारीरिक संबंधाचा आनंद कसा घ्यावा हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

चुकीच्या साइजच्या कंडोमने अडचण

लैंगिक क्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधकाचा वापर गरजेचा आहे. कंडोम हा यासाठी सर्वात जास्त लोकप्रिय आणि वापरला जाणारा पर्याय आहे. पण हे जाणून घेणं गरजेचं असतं की, तुम्ही चुकीच्या साइजचा कंडोम तर वापरत नाही ना. असं असेल तर तुम्हाला लैंगिक क्रियेत वेगवेगळ्या अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच योग्य साइजचा कंडोम वापरत नसाल तर तुम्हाला STD इन्फेक्शनचा धोकाही राहतो. त्यामुळे योग्य साइजचाच कंडोम वापरा. 

सर्वांसाठी एक साइज नाही...

कपडे आणि शूजच्या फिटिंगप्रमाणेच गर्भनिरोधकच्या वापरावेळीही साइजचं महत्त्व असतं. बाजारात मिळणारे कंडोम सामान्यपणे स्मॉल, मीडियम, लॉन्ग आणि स्लिम प्रकाराचे असतात. इथे लक्ष देण्याची बाब ही आहे की, इथे एकच साइज सर्वांना फिट होईल हा फंडा चालू शकत नाही. मीडियम साइजचा एक कंडोमही वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असू शकतो. त्यानंतरही तुम्ही साइजबाबत संतुष्ट नसाल किंवा कळत नसेल की, कशी ही समस्या दूर करावी तर वेगवेगळ्या साइजचे कंडोम ट्राय करा आणि त्यातील जो योग्य साइजचा वाटेल तो वापरा. 

असा निवडा योग्य कंडोम

योग्य कंडोम निवडण्याआधी गुप्तांगाची साइज मोजावी. तज्ज्ञांनुसार, सामान्य मेजरिंग टेपनेही तुम्ही प्रायव्हेट पार्टचं माप घेऊ शकता. सोबतच कंडोमचा वापर करताना याची काळजी घ्या की, कंडोम चांगल्याप्रकारे प्रायव्हेट पार्टला चिकटून असावा आणि बाहेर काढताना फाटू नये. 

वेगवेगळे ट्राय करा

कंडोम केवळ वेगवेगळ्या साइजमध्येच नाही तर वेगवेगळ्या स्टाइल आणि फ्लेवरमध्येही मिळतात. हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर निर्भर करतं की, कोणता कंडोम वापरावा. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात लोकप्रिय कंडोम व्हेरिएंटबाबत सांगायचं तर रिब्ड, डॉटेड, फ्लेवर्ड आणि नॉन फ्लेवर्ड कंडोमची सर्वात जास्त विक्री होते. 

Web Title: Sexual life: Are you using the right size condom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.